शिक्षक सेनेचे शिक्षकांच्या समस्येसंदर्भात गटविकास अधिकारी यांना निवेदन...


 जळगांव जा.प्रतिनिधी:-

महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना जळगाव जामोद तालुक्याच्या वतीने जळगाव जामोद तालुक्यातील शिक्षकांच्या प्रलंबित असणाऱ्या विविध समस्या निवारण्याकरिता गटविकास अधिकारी शिवशंकर भारसाकडे यांच्याकडे शिक्षकांच्या समस्या व चर्चा करण्याकरिता वेळ मिळावा यासंदर्भात निवेदन सादर करण्यास गेले असता गटविकास अधिकाऱ्यांनी शिक्षकांच्या समस्या सोडविण्यास सुरुवात केली. अनेक दिवसांपासून शिक्षकांच्या समस्या प्रलंबित होत्या त्यामध्ये वेतन वेळेवर न होणे,भविष्य निर्वाह निधीची प्रकरण, मेडिकल बिले, वरिष्ठ वेतन श्रेणीची देयके , सेवा पुस्तक पडताळणी अशा समस्या अनेक दिवसांपासून प्रलंबित होत्या. त्या समस्यांवर चर्चा करण्याकरता शिक्षक सेनेच्या तालुका कार्यकारिणीने गटविकास अधिकारी यांची वेळ मिळण्याकरिता निवेदन सादर केले असता गटविकास अधिकारी यांनी वेळखाऊ पणा न करता लगेच संबंधित शिक्षण विभाग व लेखा विभागाचे कर्मचारी यांना बोलावून शिक्षक सेनेच्या शिष्टमंडळा समोरच सर्व समस्यांची माहिती घेत लगेच सोडविण्यास सांगितल्या त्यापैकी प्रलंबित देयके येत्या दोन ते आठ दिवसात सोडविण्यास व प्रत्येक कामाचे वेळापत्रक तयार करून त्यानुसार वेळेच्या मर्यादितच कार्य करण्याचे संबंधित कर्मचाऱ्यांना सूचना केल्या. सेवा पुस्तक पडताळणी शिबिर लवकरच घेण्यासंदर्भात आश्वासित केले . झिरो पेंडन्सी राहावी या हेतूने कर्मचाऱ्यांना सूचना केल्या .निवेदन देतेवेळी  शिक्षक सेनेचे तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण भटकर ,सहसंपर्कप्रमुख उमेश खारोडे,  तालुका  कार्याध्यक्ष निलेश काळे ,सरचिटणीस दिलीप वानखडे ,कोषाध्यक्ष आशिष चिंचोळकर, उपाध्यक्ष संतोष वेरूळकर ,प्रसिद्धीप्रमुख अनिल भगत ,संघटक समाधान निकम , पडघान सर व इतर शिक्षक सेनेचे शिलेदार  उपस्थित होते.

Previous Post Next Post