बुलढाणा विशेष/अनिल भगत...
बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील बावनबिर येथील टुनकी मेन रोड वरील ईदगाह परिसरामध्ये आज दिनांक तीन मे रोजी सकाळी ७:३० वाजता दरम्यान ईदगाव परिसर समोरील जुन्या वादातून एकमेंकांना जबर मारहाण झाल्याची गंभीर घटना घडली असुन. त्यात घडलेल्या तुफान हाणामारीत बावनबीर येथील शेख रफिक शेख गणी वय २७ वर्ष या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आज रमजान ईद निमित्त गावातील समस्त मुस्लिम बांधव नमाज पठण करण्याकरिता जात असताना अचानक दोन्ही गटातील व्यक्तींनी एकामेकांना गंभीर स्वरूपाचे मारहाण केल्याने या ठिकाणी उपस्थित पोलीस व ग्रामस्थ यांनी दोन्ही गटाच्या नागरिकांना शांततेचे आवाहन करण्यात आले.आणि आज घडलेल्या गंभीर घटनेतील व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतले...!जुन्या वादातून एकमेकांची खुन्नस काढुन ईदगाव च्या समोरील मोठमोठ्याने शिवीगाळ करत तुफान हाणामारी करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ठाणेदार श्रीधर गुट्टे हे घडलेल्या घटनास्थळी तात्काळ गाठत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.
 
