सय्यद शकिल/अकोट ता.प्रतिनिधी...
मुस्लिम धर्मियांचा सर्वात मोठा सण म्हणजे रमज़ान ईद,त्या दृष्टीने आज जमीयत अहले हदीस अकोट तर्फे जूनी ईदगाह लक्कडग़ंज येथे ईद ची सामूहिक नमाज़ पठन करण्यात आली,त्यानंतर जमीयत अहले हदीस अकोट तर्फे उपविभागीय पोलिस अधिकारी आईपीएस कु.रितु जी खोकर,अकोट शहर चे थानेदार श्री.प्रकाश अहिरे, यांचा शाल श्रीफल देवून सत्कार करण्यात आला,यावेळी ट्रस्ट चे अ. रफीक हाजी,अलाउद्दीन बाबू ,अमान बाबू,मुजीब सर,मौलाना शहादत,हाफिज शाकिर,मौलाना गफ्फार,मो.जमील (जमु पटेल),मतीन मौलाना,यांच्या सह सर्व पोलिस कर्मचारी,अधिकारी,व समस्त मुस्लिम बांधव उपस्थित होते.
