भेंडवळ बीटमधील राखीव वनपरिक्षेत्रास आग लावत असलेल्या इसमास वनपरिक्षेत्र विभागाने रंगेहाथ पकडले...

 

जळगांव जा.प्रतिनिधी:-

जळगाव जामोद वनपरिक्षेत्रात येत असलेल्या भेंडवळ बीटमध्ये अज्ञात इसम आग लावून राखीव वनपरिक्षेत्राचे तसेच वनाचे नुकसान करून मोठ्या प्रमाणात आगी लावत असल्याची गुप्त माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी बी डी कटारिया यांना दिनांक सात मे रोजी मिळाली असता वनपरिक्षेत्र अधिकारी कटारिया हे आपल्या टीमसह भेंडवळ येथील वनपरिक्षेत्रात गेले असता भेंडवळ बीट मधील 451 मध्ये अज्ञात इसमाने अंगार लावली आहे असे दिसून आले असता त्याच ठिकाणी आग लावणारा आरोपी नामे रामदास देवचंद सैरीशे वय 54 वर्ष राहणार परसोडा तालुका संग्रामपुर जिल्हा बुलढाणा याला घटनास्थळावरून रंगेहात पकडून ताब्यात घेतले व त्यावर वन गुन्हा क्रमांक 00685/11113 नोंदविण्यात आला सदरील कारवाई उपवनसंरक्षक अक्षय गजभिये व सहाय्यक वनसंरक्षक आर आर गायकवाड यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली सदर कारवाई कामी वनपरिक्षेत्राधिकारी कटारिया यांच्यासह वनपाल दंडे, वनरक्षक संदीप देवकर भेंडवळ बीट, जीएस खोलगडे, आरती पर्वते, नीता फाळके,प्रकाश चितोडे,भगवान जामुनकर चालक गणेश तराडे यांनी ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली. यावेळी वनपरिक्षेत्राधिकारी कटारिया यांनी सर्व नागरिकांना असे आव्हान केले की राखीव वनात अंगार लावणे हा अजामीनपात्र गुन्हा असून तरी कोणी इसम अंगार लावण्याचे कृत्य करताना आढळून आल्यास तर त्या इस्मा बद्दल वनविभागाला माहिती द्यावी असे आवाहन यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी कटारीया यांनी केले.

Previous Post Next Post