हिवरखेड पोलिसांनी दिनांक १६ मै च्या दुपारी गावातील गुप्ता कॉपलेस जवळ सुरू असलेल्या वरली मटक्यावर कारवाई केली, असता त्या मध्ये आरोपी जवळ वरली मटक्याचे साहित्य एकूण रक्कम २०५० रुपयांचा माल मिळून आला,तर आरोपी नितीन रमेश अग्रवाल, जहिर सौदागर विक्रामोद्दीन रा दोन्ही हिवरखेड या आरोपींविरुद्ध १२ अ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला तर त्याच दिवशी झरीबाजार परिसरात वरली मटक्यावर धाड टाकली यांमध्ये १२ अ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला ,आरोपी कांशीराम शंकर गाडगे,अनवर मेताब घट्टे, नंदलाल अग्रवाल,अरुण घ्यार,संजय रावसाहेब मगर,मिळालेला माल ६५२०रुपयाचा जप्त करण्यात आला, तसेच हिवरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या तळेगाव बाजार येथे राजू गांधी शाळा परिसरा बाहेर तंबाखू जन्य पदार्थांची विक्री करण्यास बंदी असल्यावरही आरोपी अस्लम शाह,गफूर शाह तंबाखू जन्य पदार्थाची विक्री करत असताना आढळून आला,आरोपी जवळून ४२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला,असून कलम ६ (ब)२४,१ पो,को नुसार गुन्हा दाखल करण्यात आला, ठाणेदार विजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हिवरखेड पोलीस पुढील तपास करीत आहे,
हिवरखेड पोलिस अवैध धंदे बंद करण्यासाठी सक्रिय,एकाच दिवशी वरली मटक्यावर कारवाई तर तंबाखू जन्य पदार्थ विक्रीवर कारवाई,...
प्रशांत भोपळे/हिवरखेड प्रतिनिधी...
