सोमवारखेडा ते गौलखेडा बाजार येथील रस्तावर होत असलेले रफट्याचे कामे निकृष्ट दर्जाचे..


 राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी

चिखलदरा तालुक्यात पंतप्रधान ग्राम सडक योजने मधून रस्ताचे कामे होत आहे. या रस्त्यावर शासनाने चागले कामे व्हावे म्हणून करोडो रुपये टाकले असुन या रस्त्यावर होणारे रफटे व डांबरीकरण एकदम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे दिसून येत आहे.तसेच सोमवारखेडा ते गौलखेडा बाजार या दोन गावाचा अंतर तिन किलोमीटर असुन या तिन किलोमीटर च्या आत सात ते आठ रपटे आहेत या मध्ये दोन रपटे चे बांधकाम सुरू असुन या कामावर गिट्टी  व रेती एकदम निकृष्ट दर्जाचे असून हा काम होत आहे. तसेच या कामावर एकही शासकीय अधिकारी नसुन कंत्राटदार आपली मनमानी करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. याला जबाबदार कोण असा प्रश्न येजा करणारे वाहन चालक करीत आहेत. तसेच सोमवारखेडा ते गौलखेडा बाजार व एकझिरा ते मोझरी या चार गावाच्या मध्यतंरी रस्त्यावर जवळ पास सोळा रपटे चे बांधकाम असुन यावर डांबरीकरण आहे. बोलल्या जात आहे कि हे काम मध्यप्रदेश येथिल कंत्राटदाराला काम मिळाले असुन यांचे काम एकदम भोगस रित्या केले जाते. म्हणून येथील रस्तावर चे अधिकाऱ्याचे व पदाधिकाऱ्यांचे लक्ष ठेवणे गरजेचे समजले जाते. 

---------------------------------------

तसेच या कामा बद्दल अभियंता वानखडे यांना दुरध्वनी व्दारे विचारणा केली असता तर संपर्क होवू शकला नाही.

Previous Post Next Post