"वारीच्या डोहात एक बाद एक बळी,आता डोहाने घेतला तिसरा बळी,डोह बुजविण्याबाबत निर्लज्ज यंत्रणेने झोपेचे सोंग घेतल्याने जनता संतप्त...


प्रशांत भोपळे/हिवरखेड प्रतिनिधी....

हिवरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या वारी भैरवगड येथील प्रसिध्द मामा भाच्याच्या डोहात याच महिन्यात तीन बळी गेले तरीही मात्र प्रशासन झोपेत,वारी येथील कुख्यात मामा-भाचा डोहाने एकाच महिन्यात तिसरा बळी घेतला आहे आतापर्यंत शेकडो जीव घेणाऱ्या वारी येथील कुख्यात मामा भाचा डोहात आज दि. 18 मे रोजी एक अनोळखी प्रेत तरंगताना दिसले. मृतकाने पांढरा शर्ट व काळा रंगाचा पॅन्ट असे कपडे घातलेले प्रथमदर्शनी दिसत आहे. वारीचे सरपंच शिवाजी पतींगे यांनी हिवरखेड पोलिसांना कळविले असून हिवरखेड पोलीस घटनास्थळी पोहोचत आहे. याच महिन्यात अकोला येथील राज गुढधे नामक युवक आणि हिवरखेड येथील प्रशांत पिसोळे सुद्धा याच डोहात बुडून मृत्यू पावले होते. आतापर्यंत शेकडो कुटुंबाचे चिराग या डोहात विझले आहेत परंतु डोह बुजविण्याबाबत निर्लज्ज यंत्रणेने झोपेचे सोंग घेतल्याचा आरोप संतप्त जनता करीत आहे. सदर मृतकाला कोणी ओळखत असल्यास त्यांनी कृपया याबाबत हिवरखेड पोलिसांना माहिती द्यावी ही

Previous Post Next Post