धर्म संस्काराचे बिजारोपण हे धर्मपीठ करते , ना . डॉ राजेंद्र शिंगणे यांचे प्रतिपादन सिद्धलिंग शिवाचार्य महाराज यांचा सहस्त्रदर्शन सोहळ्याची सांगता...


 सिंदखेडराजा सचिन खंडारे

धर्म संस्काराचे महत्त्व सांगून त्याचे बिजारोपण करण्याचे कार्य धर्मपीठात होते . ती परंपरा जोपासण्याचे काम मठाधिपती वेदांतचार्य शिवाचार्यरत्न सद्गुरु सिंध्दलिंग शिवाचार्य महाराज यांनी केले . ती परंपरा पुढे अबाधित राखण्यासाठी त्यांनी या मठाच्या गादीवर सिध्दचैतन्य महाराज यांचा पट्टाभिषेक करुन सोपवली . गेल्या ५० वर्षात त्यांनी संस्थानच्या उन्नतीसाठी जे कार्य केले ते खरोखरच अतुलनीय आहे. या संस्थानच्या प्रगतीसाठी जे काही सहकार्य लागेल ते १०० टक्के करु असे उद्गागार अन्न व औषध प्रशासन मंत्री ना डॉ राजेंद्र शिंगणे यांनी काढले . ७ मे रोजी मठाधिपती सिद्धलिंग शिवाचार्य महाराज यांचा सहस्त्रदर्शन सोहळा संपन्न झाला . त्यानंतर धर्मसभेतून ते बोलत होते . यावेळी या मठाच्या अधिपत्याखाली असलेल्या मठाचे सर्व गुरुवर्य तसेच खासदार प्रतापराव जाधव , आमदार डॉ संजय रायमुलकर , आमदार हरिष अप्पा पिंपळे , महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने सरचिटणीस शाम उमाळकर , शिवासंघटणेचे प्रदेशाध्यक्ष मनोहर धोंडगे , जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य राम जाधव , चिखलीचे माजी नगराध्यक्ष सुरेश अप्पा खबुत्तरे , सरपंच दाऊत कुरेशी , माजी सरपंच कमलाकर गवई  सुधीर अप्पा बेंदाडे , समाजभूषण अर्जुन गवई मदनसेठ जैस्वाल , ग्राम पंचायत सदस्य संतोष जैस्वाल ,  माजी उपसभापती सुनील जगताप , चंद्रशेखर शुक्ल , सोसायटीचे अध्यक्ष ललित अग्रवाल , ग्राम पंचायत सदस्य सय्यद रफीक , संजय गांधी निराधार योजना सदस्य शुभम राजपुत , बाळासाहेब बेंदाडे , श्री पलसिद्ध कंसट्रकशन कंपणीचे अर्जून काटे , जनार्धन काटे , रामदाससींग राजपुत , इब्राहीम शहा , अनिकेत सैनिक स्कुलचे अध्यक्ष अर्जून गवई उपस्थित होते . खासदार प्रतापराव जाधव पलसिध्द महास्वामी यांच्या धर्मपीठात येतांना राजकीय वैचारिक जोडे बाहेर काढून धर्मपीठावरुन वैचारिक मेजवानी घेऊन समाज जोडण्याचे काम या संस्थान मधून महाराज श्रींनी केले . या कार्यासाठी आपण सर्वती मदत करु असे आश्र्वासन खासदार प्रतापराव जाधव यांनी दिले . 

शाम उमाळकर .........

सहस्त्रदर्शन सोहळा म्हणजे सर्व गोष्टींचा त्याग करून जबाबदारीतून मुक्त होणे . महाराज श्रींनी सहस्त्रदर्शन सोहळ्या अगोदर वेदमूर्ती निळकंठ स्वामी यांचा पट्टाभिषेक केला . आणि यापूढची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली . त्याग मोह , माया या तीन गोष्टीची फोड करीत खास आपल्या शैलीत मार्गदर्शन केले यावेळी आमदार हरिष अप्पा पिंपळे , शिवा संघटणेचे प्रदेशाध्यक्ष मनोहर धोंडगे , सुरेश अप्पा खबुत्तरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले . 

-----------------------------------

५० वर्ष श्री पलसिद्ध महास्वामीं चरणाच्या निष्ठेचे फळ --- सिध्दलिंग शिवाचार्य महाराज श्री पलसिद्ध महास्वामीं यांच्या चरणाशी निष्ठा ठेवून समाज कार्य करीत राहिलो . यासाठी विरशैव लिंगायत समाज बांधवांचे जेवढे सहकार्य मला लाभले तेवढेच सहकार्य इतर समाजाचेही सहकार्य लाभले . ५० वर्षांत जी काही कामे , सेवा माझ्या हातून झाली , त्यात कुणाचेही मण दु:खविण्याचा उद्देश नव्हता . सेवा करणे हा एकमेव ध्यास होता . यापुढेही माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत सेवा करणार  असे प्रबोधन मठाधिपती सिद्धलिंग शिवाचार्य महाराज यांनी धर्म पीठावरुन केले .कार्यक्रमाचे प्रास्ताविक सिध्दचैतन्य शिवाचार्य महाराज यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रख्यात निवेदक अजीम नवाज राही यांनी केले . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवानंद वाकदकर यांच्यासह सर्व उत्सव समितीचे अध्यक्ष , सदस्य यांनी सहकार्य केले .

Previous Post Next Post