रेल्वे बोर्डाच्या प्रवासी सुविधा समितीकडून शेगाव, जलंब, खामगाव रेल्वे स्थानकाची पाहणी. २९ जूननंतर रेल्वे सेवा आणि सुविधा पूर्ववत केल्या जातील रेल्वे बोर्डाच्या प्रवासी सुविधा समितीने आश्वासन दिले..


 सुरज देशमुख/बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी R.C24 न्युज..

कोरोनाच्या कहरामुळे दोन वर्षांपूर्वी रेल्वे प्रशासनाने सर्व रेल्वे गाड्यांना थांबा दिला होता. आता कोरोना ची परिस्थिती निवळल्यानंतर रेल्वे विभाग टप्प्याटप्प्याने रेल्वेगाड्या सुरू करीत आहेत. यामध्ये 29 जून पासून सर्व गाड्या सुरू होतील व पॅसेंजर गाड्या हिनियमितपणे धावतील असे आश्वासन रेल्वे बोर्डाच्या प्रवासी सुविधा समितीने बोलताना दिली. शेगाव रेल्वे स्थानकाला भेट दिल्यानंतर समितीच्या सदस्यांनी शहरातील व्यापारी वर्ग रेल्वे अधिकारी रेल्वे समितीच्या सदस्यांची चर्चा करताना ते बोलत होते.भुसावळ रेल्वे विभागाअंतर्गत येणाऱ्या अमरावती, बडनेरा, मुर्तीजापुर, अकोला, शेगाव, खामगाव आदी रेल्वे स्थानकावर प्रवाशांना देण्यात येणाऱ्या सेवा व सुविधांचा आढावा घेण्याकरता रेल्वे प्रशासनाने तीन सदस्यीय समिती नियुक्ती केलेली आहे. शेगाव रेल्वे स्थानकावरील सार्वजनिक सेवा व सुविधांचा आढावा घेण्यासाठी हि तीन सदस्यीय प्रवासी सेवा समिती मंगळवारी येथे दाखल झाली होती.  या समितीने रेल्वे स्थानकावर पोहोचून येथील सेवा व सुविधांचा आढावा घेतला. यावेळी खामगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार ऍड आकाश फुंडकर यांच्यासह रेल्वे अधिकारी आणि स्थानिक समिती सदस्यांनी रेल्वे बोर्डाच्या प्रवासी सुविधा समिती प्रमुख डॉ.राजेंद्र फडके, कैलाश वर्मा आणि ऍड श्रीमती विभा अवस्थी यांचे स्वागत सत्कार करण्यात आले. यांनतर शेगाव रेल्वे समिती, शहरातील व्यापारी वर्ग, प्रवाशी संघ आणि भाजपाच्या शिष्ट मंडळाशी चर्चा करण्यात आली.  ते म्हणाले की, कोविडपूर्वी रेल्वेने पुरविलेल्या सेवा आणि सुविधा न मिळाल्याने प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. आणि त्यामुळे रेल्वेच्या उत्पन्नावर परिणाम होत असल्याची रेल्वे बोर्डही दखल घेत आहे. हे पाहता, कोविड निर्बंध आणि अटींसाठी 29 जून ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे. यानंतर, रेल्वे आपल्या पूर्वीच्या सेवा आणि सुविधा प्रदान करेल. असे ते म्हणाले.  यावेळी रेल्वे स्थानकातील सर्व विभाग प्रमुख प्रामुख्याने उपस्थित होते.

Previous Post Next Post