जळगाव जामोद बऱ्हाणपूर रोडवरील घाटातील रस्ता बांधकाम पूर्णत्वाकडे.आ डॉ संजय कुटे यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश...


जळगांव जा.प्रतिनिधी:-

महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश या दोन।राज्यांना जोडणाऱ्या जळगाव जामोद ते बऱ्हाणपूर या रस्त्याची गेल्या एक वर्षापासून दयनीय अवस्था झाली होती. निमखेडी ते तीनखुटी पर्यंतच्या महाराष्ट्र राज्याच्या हद्दीत हा रस्ता पूर्ण पणे खराब झाला होता. त्यामुळे सदर रस्ता तातडीने दुरुस्त व्हावा याकरिता नागरिकातुन मागणी होत होती. त्यांनतर आ डॉ कुटे यांनी ह्या बाबत सातत्याने पाठपुरावा सुरू केला त्यातील वनविभागाच्या अडचणी दूर केल्या आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या मागे सतत पाठपुरावा केला. त्याचाच भाग म्हणून गेल्या काही दिवसापासून कामाला सुरुवात झाली असून येत्या 4/5 दिवसात निमखेडी फाटा ते तीन खुटी पर्यंतचा महाराष्ट्र हद्दीतील रस्ता पूर्णत्वास जाणार आहे.

----चौकट----

जळगाव जामोद शहरच्या नागरिकांच्या व व्यापाराच्या दृष्टीने जळगाव जामोद ते बऱ्हाणपूर रस्ता अत्यंत महत्वाचा असून यातील निमखेडी ते तीनखुटी या भागाचे कामाला सुरुवात झाली असून हे काम लवकरच पूर्ण होईल. तसेच तीनखुटी पासून मध्यप्रदेशातील दर्यापूर पर्यंत च्या लांबीमधील काही भाग खराब झाला असून त्याबाबत ही मध्यप्रदेश सरकारशी पाठपुरावा सुरू आहे. ते ही काम लवकर च सुरू होणार आहे. 

आ डॉक्टर संजय कुटे

Previous Post Next Post