पिंपळगाव काळे येथील अंगणवाडी सेविकांनी राज्य मंत्री बच्चू कडू यांना अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत दिले निवेदन..


 मंगल काकडे. जळगाव जामोद तालुका प्रतिनिधी..

जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे येथे महाराष्ट्र राज्याचे महिला व बाल विकास राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या धावत्या भेटी दरम्यान पिंपळगाव काळे येथे सर्वप्रथम अंगणवाडी सेविका. अपंग बांधव ग्रामपंचायत सरपंच आशाताई कळसकार. उपसरपंच भारतीताई बांगर. ग्रामपंचायत सदस्य या सर्वांकडून हार घालून नामदार बच्चू कडू यांचा सत्कार करण्यात आला. तसेच माजि जिल्हा परिषद अध्यक्ष तथा जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष बुलढाणा प्रकाश पाटील यांच्याकडून नामदार बच्चू कडू यांचा शाल श्रीफळ व हार घालून सत्कार करण्यात आला. व नामदार बच्चू कडू यांना अंगणवाडी कर्मचारी संघटना बुलढाणा शीटू व्हा च्या वतीने महाराष्ट्र राज्याचे महिला व बालविकास राज्यमंत्री यांना निवेदन केले की बुलढाणा जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका मदतनीसांचे अनेक स्थानिक आणि राज्यपातळीवरील प्रश्न प्रलंबित आहे. मुळातच मिळत असलेले अत्याअल्प मानधन आणि तेही वेळेवर मिळत नसल्याने गेल्या दोन तीन महिन्यापासून सेविका मदतनिसांचे मानधन जिल्ह्यात थकीत आहे. त्याच बरोबर गेल्या दोन तीन वर्षापासून मासिक मिटिंगचा प्रवासभत्ता मिळालेला नाही. दोन वर्षापासून अंगणवाडीचे जागा भाडे मिळालेले नाही. अनेक अंगणवाडी केंद्राला स्वतःची इमारत नाही. ज्या ठिकाणी इमारत आहे. त्या ठिकाणी वीज पाणी आणि स्वच्छतागृहाची व्यवस्था नाही. वर्षभरापासून गणवेशासाठी आर्थिक तरतूद करण्यात आलेली नाही. मोबाईल रिचार्ज सोबतच इतर इंसेटीव थकीत आहे. अंगणवाडी सेविका मधून मुख्य सेविकांची भरती अनेक वर्षापासून झालेली नाही त्यामुळे अनेक पात्र सेविकांवर अन्याय होत आहे. आम्हा अंगणवाडी कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा यासाठी अंगणवाडी कर्मचारी संघटना शिटू व्हा च्या वतीने महिला व बालविकास राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य बच्चू कडू यांना निवेदन देण्यात आले.यावेळी अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते. विजया संजयसिंग जाधव तालुका सहसचिव. ज्योसना रामराव अवचार बीट सचिव.सोनाली समाधान वाघ. सिंधू श्रीरंग बोडखे. कमल सुभाष घोगले. मालती समाधान चौखंडे. कु.वर्षा हरिभाऊ पांडव. आरेफा बानो तसलीम खान. शकुंतला प्रताप सिंग बोराळे. जयश्री विलास केदार. मंगला अरुण इसोकार. कल्पना राजेंद्र जाधव. मीनाक्षी विनोद लोंढे.कु. उषा माणिक गिरे. कल्पना पुरुषोत्तम अवचार. वंदना श्रीकृष्ण वानखडे. मनोरमा ओंकार खाटोडे. सरिता राजू पाटील. अर्चना सुपडा वावगे. चंदू बाई धनराज लोकरे. रेखा मंगेश मानकर. या सर्व सदस्यांचे सह्यां चे निवेदन नामदार बच्चू कडू यांना दिले.

Previous Post Next Post