राजस्थान कोटा शिक्षण प्रणाली आपल्या जळगाव जामोद शहरात. जळगाव जामोद परिसरातील विद्यार्थ्यांना आश्चर्याचा धक्का...


जळगांव जा.प्रतिनिधी:-

स्वामी विवेकानंद राष्ट्रीय ज्ञानपीठ या शिक्षण संस्थेने जळगाव जामोद तालुक्यासह जिल्ह्यामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये एक वेगळी झेप घेतली आहे. स्वामी विवेकानंद राष्ट्रीय ज्ञानपीठ या शिक्षण संस्थेने जळगाव जामोद तालुक्याचा मान वाढविला आणि त्यांच्या कार्याची पावती म्हणून त्यांना एका न्यूज चॅनलच्या वर्धापन दिनानिमित्त संस्थापक अध्यक्ष अँड. गिरीश माळपांडे यांना शिक्षण महर्षी या पुरस्काराने सन्मानित केले गेले होते. आणि त्यां पुरस्काराला गिरीष माळपांडे सरांनी सार्थ ठरवीत आज जळगाव जामोद सारख्या दुर्गम भागात राजस्थानची कोटा शिक्षण प्रणालीची सुरवात होणे हे एक मोठे यश आणि संस्थेची उंच शिखराकडे झेप घेणारे पाऊल किंवा हा एक अजूबा म्हटल्यास ते पण वावगे ठरणार नाही.राजस्थान कोटा शिक्षण प्रणाली आजपर्यंत विदर्भामध्ये सुध्दा उपलब्ध नसताना या शिवाय औरंगाबाद, खान्देश सारख्या शहरामध्ये  नसताना  जळगाव जामोद सारख्या ग्रामीण भागात शाखा प्रस्थापित करणे हे आमचे भाग्य आणि माळपांडे सर यांचे उपकार.. त्यांच्या या प्रयत्नाचे सर्व स्तरावर अभिनंदन होत आहे.जळगाव (जामोद) शहरात प्रथमच एक नवीन सुरुवात होत आहे,ती म्हणजे NEET, JEE-Advance YCCP, PCCP, CA Faundation ची तयारी .आणि हो आता आपल्या जळगाव शहरात. KOTA RESONANCE येथील तज्ञ मार्गदर्शक, जागतिक स्तरावर पात्र ठरलेले दर्जेदार शिक्षण आपल्या गावात उपलब्ध होणार आहे, त्या सोबत भव्य इमारत,सुसज्ज लायब्ररी,मुलींसाठी सुरक्षित वातावरण या सर्व सुविधा युक्त शिक्षणाचे दालन स्वामी विवेकानंद ज्ञानपीठ उपलब्ध करणार आहे. त्यांच्या या नवीन शिक्षण प्रणालीची माहिती म्हणून राजस्थान येथील कोटा शिक्षण संस्थेतील प्रतिनिधी यांनी उपस्थित राहून म्हणून दिनांक 30 मे 2022 रोजी सकाळी 10:00 वाजता, सांकृतिक भवन, जळगाव जामोद येथे एक सेमिनार आयोजित केला होता आणि या सेमिनारला तालुक्यातील शेकडो विद्यार्थी व पालकांनी कोणत्याही प्रकारची जाहिरात किंवा गाजावाजा न करता हजेरी लावने हे विशेष.

Previous Post Next Post