भाजप प्रवक्त्या नुपुर शर्मांविरोधात एआयएम रस्त्यावर.कारवाईसाठी जिह्याभरात निवेदने.शेगाव, खामगावात येथे निषेध....


 बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी/ सुरज देशमुख 

एका वृत्तवाहिनीवरील चर्चेत प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणे भाजप प्रवक्त्या नुपुर शर्मा यांच्याविरोधात मुंबईत रझा अकादमीने एफआयआर दाखल केला आहे. तर आता राज्यभरात ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन म्हणजेच एमआयएम कडून ठिकठिकाणी कारवाईसाठी निवेदने आणि निदर्शने होत आहे.आज मंगळवारी बुलढाणा जिल्हयातही तहसील कार्यालयावर कारवाई साठी निवेदने देण्यात आले. एका वृत्तवाहिनीवरील चर्चेत भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नुपुर शर्मा सहभागी झाल्या होत्या. या चर्चेदरम्यान नुपुर यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत काही आक्षेपार्ह विधाने केली. या वक्तव्यामुळे मुस्लिम समुदायाच्या भावना दुखावल्या असल्याचे नमूद करून बुलढाणा जिल्ह्यातही ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन म्हणजेच एमआयएम कडून मंगळवारी जिल्ह्याची तहसील कार्यालयांवर निदर्शने, निषेध आणि निवेदने देण्यात आली. शेगाव येथे शहर अध्यक्ष शेख मुख्तार ठेकेदार आणि खामगावात  शहर अध्यक्ष आरिफ पहेलवान यांच्या नेतृत्वात निषेध व्यक्त करीत निवेदने देण्यात आली. कठोर कारवाई न झाल्यास पक्ष रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

Previous Post Next Post