अडगाव बनले गुटख्याचे माहेरघर,अडगाव बु मध्ये गुटख्याबाबत लाखो रुपयांची उलाढाल,फरार आरोपी असून करतात गुटखा विक्री,


 प्रशांत भोपळे/हिवरखेड प्रतिनिधी...

हिवरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेले  अडगाव बु  हे अवैध गुटखा विक्रीचे माहेरघर बनले असून  येथिल  गुटखा माफीये  त्यांची दादागिरी  सुद्धा सामान्य जनतेवर राबवितात त्यांच्या दादागिरीने सामान्य जनतेला नाहकच त्रास सहन करावा लागत आहे, या गुटखा माफियाचे हात आकोला पोलिसांन सोबत मिळलेले असल्याने स्थानिक पोलीस प्रशाशनाचा वचक या  माफियांनवर चालत नाही , या पूर्वी आकोला अन्न औषध प्रशासनाने अडगाव बु येथे गुटख्यावर कारवाई केली होती त्यामध्ये एक आरोपी जप्त केला होता तर दोन मुख्य आरोपी फरार होते, ते फरार आरोपी नाममात्र फरार असल्याचे दिसून येत आहे,व गुटखा विकण्यासाठी सक्रिय असून लाखो रुपयांची गुटखा विक्री अडगाव बु येथे ते करत असल्याचे बोलले जात आहे,अडगाव येथे मध्यप्रादेशातून गुटखा येतो आणि मोर्शी वरून मोठं मोठे वाहन येत असल्याचे सुद्धा दिसून येते आणि अडगाव येथून परिसरास गुटख्याची विक्री केली जात असून या मुळे शाळकरी विद्यार्थी याच्या आरोग्यास परिणाम होतो तर या गुटखा माफियांच्या दादागिरीने मोठं मोठे वाद निर्माण होण्याचे संकेत दिसून येतात, या संबधीत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन या अडगाव येथील माफियांचा बंदोबस्त करावा अशी मागणी सामान्य नागरिक करीत आहे,

Previous Post Next Post