जळगांव जा.प्रतिनिधी:-
जळगाव जामोद येथे संवाद यात्रा तसेच कृतज्ञता सोहळा मध्ये आलेल्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना जळगाव जामोद तालुका व शहर एम आय एम आय एम च्या वतीने मुस्लिम समाजाच्या विविध मागण्यांकरिता अजित दादा पवार यांना शहराध्यक्ष समीर आर्यन यांच्या नेतृत्वात दिले निवेदन. महाराष्ट्र राज्यातील मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण शिक्षण व नोकरीमध्ये संधी तसेच मौलाना अब्दुल कलाम आझाद आर्थिक विकास महामंडळ चा निधी मंजूर करावा मौलाना अब्दुल कलाम आझाद महामंडळ संचालकांची तात्काळ नेमणूक करण्यात यावी जिगाव प्रकल्प डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे अशा आशयाचे निवेदन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना देण्यात आले सदर निवेदन देतेवेळी एम आय एम आय एम चे शहराध्यक्ष समीर आर्यन रशीद खान गुलाब शेख मोहम्मद अनिस इरफान हुसेन, मोहम्मद शहजाद शोयब खान उपस्थित होते.
