दानापूर येथील केळीबाग आगीत खाक...

तेल्हारा प्रतिनिधी संघपाल गवारगुरु

तेल्हारा तालुक्यातील दानापूर येथे केळीच्या बागेला आग लागल्याची घटना घडली. यामध्ये केळीबाग, 10 पाईप, टिंबक नळ्या, खतांचे पोते जळून खाक झाले. दानापूर येथील सर्वे नंबर 191 व 189 शेतकरी राजकन्या जगबहादुर ठाकुर यांनी आपल्या शेतात 1 हेक्टर 53  आर क्षेत्रावर केळीची लागवड केली होती. केळीचा माल काढणी करायच्या अगोदर या केळी बागेत भीषण आग लागून संपूर्ण केळीबाग आगीच्या रौद्र रूपात भस्मसात झाली. या आगीत काढणीला आलेली केळी, त्रिंबक, स्पिंकलर पाईप, नौझल, खतांची भरलेले व पोत्यांचे मोठे नुकसान झाले. तलाठी अंकुश मानकर यांनी पाहणी करून पंचनामा केला व अहवाल वरिष्ठांना पाठवल्याचे सांगितले.

Previous Post Next Post