राज्यसेवेच्या २०२० मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत तेल्हारा तालुक्यातील मौजे रायखेड येथील अल्पभूधारक शेतकरी अशोक जगन्नाथ नेमाडे यांची मुलगी कु. अश्विनी अशोक नेमाडे उत्तीर्ण झाली असून तिची उपशिक्षणाधिकारी पदासाठी शासनाने निवड केली आहे.तेल्हारा तालुक्यातील ग्रामीण भागात येणाऱ्या मौजे रायखेड येथील अल्पभूधारक शेतकरी अशोक जगन्नाथ नेमाडे यांचा वडीलोपारजीत शेती व्यवसाय आहे त्यांना दोन मुली व एक मुलगा आहे त्यांनी रात्रंदिवस कष्ट करून आपल्या मुलांना शिकविले त्याचे फळ त्यांना अश्विनी च्या रुपात मिळाले अश्विनी ही राज्यसेवा परीक्षेत उत्तीर्ण झाली असून तीची उपशिक्षणाधिकारी पदासाठी शासनाकडून नियुक्ती करण्यात आली आहे तिने तिच्या यशाचे श्रेय आई सौ. सुमित्रा अशोक नेमाडे वडील अशोक जगन्नाथ नेमाडे भाऊ अनिकेत नेमाडे व शिक्षक शिक्षिका मैत्रीणींना दिले आहे. तिची उपशिक्षणाधिकारी या पदासाठी निवड झाल्याने रायखेड गावांसह परिसरात आनंद व्यक्त होत आहे.
शेतकऱ्याची मुलगी झाली उपशिक्षणाधिकारी...अश्विनी नेमाडेचे राज्यसेवा परीक्षेत घवघवीत यश...
तेल्हारा प्रतिनिधी संघपाल गवारगुरु
