सेंट्रल बँक माळेगांव बाजार शाखेत मनुष्यबळाचा अभाव..अनुशेष:पिक कर्ज वाटपाला विलंब...


 तेल्हारा प्रतिनिधी संघपाल गवारगुरु

तेल्हारा तालुक्यातील माळेगांव बाजार येथील सेंट्रल बँकेच्या शाखेत तोकडे मनुष्यबळ  असल्याने बँक संबंधित कामे करण्यास कमी पडत आहे परिणामी शाखे अतंर्गत येणाऱ्या मौजे चांगलवाडी रायखेड दानापुर वारखेड माळेगांव बाजार येथील शेतकऱ्यांसह ग्राहकांना वेळेवर सेवा मिळत नसल्याने मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.सध्या खरिप हंगामातील पीक कर्ज वाटप सुरू आहे म्हणून शेतकऱ्यांची फार मोठी गर्दी बँक मध्ये दिसून येते परंतु या शाखेत केवळ दोन व्यक्ती कार्यरत असून दोघांच्या खांद्यावर जबाबदारी येऊन पडली आहे यामुळे शेतकऱ्यांना पिक कर्ज वाटप तसेच बँकींग इतर कामे विलंबाने होत आहेत तरी संबंधित वरिष्ठांनी याबाबत दखल घेऊन सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा माळेगांव बाजार येथील अनुशेष भरून काढण्याची मागणी केली जात आहे.

प्रतिक्रिया

गेल्या काही दिवसांआधी सेन्ट्रल बँक माळेगांव बाजार शाखेतील एकाच वेळी तीन कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या असल्याने पाच पैकी दोन कर्मचारी कार्यरत आहेत यामध्ये एक मॅनेजर व शिपयाचा समावेश आहे त्यामुळे बँक संबंधित कामांना विलंब होत आहे याचा ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे तरी संबंधित वरिष्ठांनी याबाबत गंभीर दखल घेऊन तात्काळ कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत.

प्रदीप कडू, ग्राहक तथा शेतकरी चांगलवाडी

प्रतिक्रिया

शाखेतील एकाच वेळी तीन कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून सध्या स्थितीत मी आणि शिपाई कार्यरत आहोत सर्व कामाचे ओझे दोघांच्या खांद्यावर आहे रिक्त जागेवर कर्मचारी रुजू होईपर्यंत कामाचा ताण कायम राहील व कामे करण्यास विलंब लागेल.

नागेश येरोकार, बँक मॅनेजर सेंट्रल बँक माळेगाव बाजार

Previous Post Next Post