स्थानिक जळगाव जामोद येथे दिनांक 31 मे रोजी एमआय एम पक्षाच्यावतीने भाजप च्या राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा यांचा निवेदन देत केला निषेध.एका वृत्तवाहिनीवरील चर्चेत प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणे भाजप प्रवक्त्या नुपुर शर्मा यांच्याविरोधात मुंबईत रझा अकादमीने एफआयआर दाखल केला आहे. तर आता राज्यभरात ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन म्हणजेच एमआयएम कडून ठिकठिकाणी कारवाईसाठी निवेदने आणि निदर्शने देण्यात आले आहे.मंगळवारी बुलढाणा जिल्हयातही तहसील कार्यालयावर कारवाई साठी निवेदने देण्यात आले.एका वृत्तवाहिनीवरील चर्चेत भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नुपुर शर्मा सहभागी झाल्या होत्या. या चर्चेदरम्यान नुपुर यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत काही आक्षेपार्ह विधाने केली. या वक्तव्यामुळे मुस्लिम समुदायाच्या भावना दुखावल्या असल्याचे नमूद करून ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन म्हणजेच एमआयएम कडून मंगळवारी जळगांव तहसील कार्यालयांवर निदर्शने, निषेध करण्यात आला. जळगांव जामोद शहर अध्यक्ष समीर अहेमद यांच्या नेतृत्वात निषेध व्यक्त करीत निवेदने देण्यात आले.नुपूर शर्मा यांच्यावर कठोर कारवाई न झाल्यास पक्ष रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे. सदर निवेदन देतेवेळी तालुकाध्यक्ष सय्यद साजिद, युवा शहराध्यक्ष रशीद खान, सय्यद खालीद, शोएब खान, मोहम्मद अनिस, मोहम्मद शहजाद उपस्थित होते.
भाजप प्रवक्त्या नूपुर शर्मा यांच्यावर कठोर कारवाईसाठी एमआयएमचे तहसीलदार यांना दिले निवेदन...
जळगांव जा.प्रतिनिधी:-
