जळगाव जामोद येथे स्वराज्यवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी...


 जळगांव जा.प्रतिनिधी:-

जळगाव जामोद शहरातील तहसील येथील छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये दिनांक 14 मे रोजी स्वराज्यवीर राजे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या चौकाच्या फलकाला पुष्पहार अर्पण करून महाराजांना अभिवादन करण्यात आले यावेळी कार्यक्रमाला गजानन वाघ, तुकाराम काळपांडे, भीमराव पाटील, राजेश लहासे, मनोज वाघ,एडवोकेट मानकर, राहुल वाघ, राजू घुटे, सतीश पाटील,विशाल पाटील, शुभम पाटील, अजित पाटील, लियाकत खान, फारुक शेख, तुकाराम गटमणे, दाभाडे सर,गजानन राजपुत, अजित घुले,अँड पाचपोर,यांच्यासह बहुसंख्य नागरिकांची संभाजी महाराज जयंती साजरी करण्यासाठी चौकात उपस्थिती होती. यावेळी सर्व मान्यवरांनी स्वराज्यवीर राजे छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करीत अभिवादन केले.

Previous Post Next Post