राज्याचे लोकप्रिय सडेतोड उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार हे संकल्प सभेच्या निमित्ताने दिनांक २१ मे रोजी जळगाव जामोद येथे येत आहेत. जिल्ह्यातील मेडिकल कॉलेजचा, कृषी महाविद्यालया असे महत्त्वाचे प्रश्न असून त्यांना मंजुरात मिळेल आणि जिल्ह्यातील रखडलेल्या प्रकल्पांना निधी उपलब्ध होईल. तसेच जिगाव धरणातील पुनर्वसन वासियांचा प्रश्न अर कचेरी वरील सिंचनाचा प्रश्न,आदिवासी विकासाचा प्रश्न असे बरेच प्रश्न प्रलंबित असून सर्व प्रश्न अजितदादांच्या माध्यमातून मार्गी लागतील आणि पक्षवाढीसाठी सुद्धा दादांच्या सभेचा उपयोग होईल, असा दुहेरी उद्देश आमचा आहे. म्हणून ह्या परिसरातील नागरिकांनी २१ मे रोजीच्या संकल्प सभेला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान जिल्ह्याचे पालकमंत्री ना. डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केले. ते दिनांक १४ मे रोजी जळगाव जामोद येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभेनिमित्त आयोजित आढावा बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड नाझेर काझी, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रसेनजीत पाटील, विधानसभा अध्यक्ष प्रकाशशेठ ढोकणे,रंगराव देशमुख यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.
--------------------------------------
लवकरच नाफेडची कांदा खरेदी सुरू होणार...!
या परिसरात कांद्याचे उत्पादन हे फार जास्त होते. कांद्याचा हमीभाव अकराशे पन्नास रुपये असतांना सध्याचा बाजार भाव फक्त चारशे रुपये प्रति क्विंटल आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे फार नुकसान होते. हा प्रश्न पालकमंत्र्यांचे कानी घालताच त्यांनी संबंधितांशी बोलून व बाजार समिती प्रशासक रमेश पाटील यांना लवकरच प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या. कांदा उत्पादक शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेता नाफेडच्या माध्यमातून लवकरच कांदा खरेदी केंद्रे सुरू करण्यात येईल असेही यावेळी पालकमंत्री ना. डॉ. राजेंद्र शिंगने यांनी सांगितले.
