पिंपळगाव काळे येथील शासकीय जमीन मालकीच्या शेत जमिनीवर नरेश छगनलाल कोठारी यांचे अवैध बांधकाम..


 मंगल काकडे. जळगाव जामोद तालुका प्रतिनिधी..

जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे येथे मध्य प्रदेश सरकार तफ्रे डेप्युटी कमिशनर बुलढाणा यांचे नावे असलेल्या पिंपळगाव काळे येथील गट नंबर २०९ मधील शेत जमिनीवर पिंपळगाव काळे येथील नरेश छगनलाल कोठारी यांनी अनधिकृतपणे अतीक्रमण करून  खाजगी तोलकाटा व काँम्प्लेक्सचे  बांधकाम सुरू केले असून ते तात्काळ थांबवून ती शेत जमीन शासनाने ताब्यात घेण्यात घ्यावी व त्या व्यक्तीवर कठोर कार्यवाही करण्यात यावी.यासाठी पिंपळगाव काळे येथील सेवानिवृत्त बँक अधिकारी गजानन उत्तमराव येवले यांनी २८/५/२०२२  शनिवार रोजी ग्रामविकास अधिकारी पिंपळगाव काळे यांना सदर प्रकरणाची तक्रार दिली आहे.  पिंपळगाव काळे येथील गट नं. २०६/२१९ मधील प्रकाश नामदेव काकडे यांच्या मालकीच्या लेआऊट मधील प्लॉट क्रमांक ७ हा लता गजानन येवले यांनी विकत घेतला.असून,त्याच्या दक्षिणेस गट क्रमांक २०९ आहे. तो गट क्रमांक शासकीय मालकिचा आहे.आणि त्याच शेत जमिनीवर नरेश छगनलाल कोठारी यानी अवैधपणे बांधकाम सुरू केले आहे.सदरचे दोन तीन फूट बांधकाम सौ.लता गजानन येवले यांच्या खाजगी जागेत केले आहे.ऐकतर अनधिकृतपणे शासकीय शेत जमिनीवर बांधकाम त्यात खाजगी व्यक्तीच्या जागेतही बांधकाम सुरू केले आहे.गट क्रमांक २०६ मधील निंबाचे झाड सुद्धा सदर व्यक्तीने तोडले आहे.संबंधित विभागाने त्याच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करणे गरजेचे आहे.त्यामुळे संबंधीत व्यक्तीने तात्काळ ते बांधकाम थांबवावे आणि संबंधित अतीक्रमण केलेल्या संबधीत व्यक्तीवर कठोर कारवाई करूण प्रशासनाने ती शेत जमीन ताब्यात घ्यावी असे तक्रारीत म्हटले आहे.सदर तक्रारीच्या प्रती तहसीलदार जळगाव जामोद आणि जिल्हाधिकारी बुलढाणा व विभागीय महसूल आयुक्त अमरावती यांना देण्यात आल्या आहे.

Previous Post Next Post