जळगाव जामोद पोलिसांनी आरोपी सह पुन्हा दोन देशी कट्टे व 9 जिवंत काडतुसे पकडले...


 बुलढाणा जिल्हा विशेष प्रतिनिधी:-अनिल भगत..

जळगाव जामोद पोलिसांना पुन्हा दोन देशी कट्ट्यासह दोन आरोपींना पकडण्यात यश आले आहे. जळगाव जामोद पोलिसांना दिनांक 20 जून रोजी गुप्त बातमी दाराकडून माहिती मिळाली की जळगाव जामोद शहरामधील खेर्डा वेस येथे राहणारा आकाश उर्फ सोनू सावतकार वय 26 वर्ष याचे जवळ देशी कट्टा आहे अशा गुप्त माहितीनुसार ठाणेदार सुनील अंबुलकर यांनी एक पथक नेमले व कारवाई कामी रवाना करण्यात आले असता त्यांनी आकाश सावतकर याला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने मोटरसायकल मध्ये लपवलेली देशी पिस्टल व दोन काडतुसं काढून दिली त्यास अधिक विश्वास घेतली असता त्याने सदरचा देशी कट्टा मध्यप्रदेशातील पाचोरा येथील अवतार सिंग यांच्याकडून घेतल्याचे सांगितले व तो दिनांक 21 जून रोजी पुन्हा दिवशी पिस्टन घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली या माहितीनुसार निमखेडी ते सुनगाव रोडवर असलेल्या नर्सरीच्या नाल्याजवळ सापळा रचून पहाटे पहाटे आरोपी अवतारसिंग यास ताब्यात घेतले त्याच्या ताब्यातून एक देशी पिस्टल व सात काडतुसे एक मोबाईल जप्त केला असे मिळून दोघं जवळून जप्त केलेला मुद्देमाल दोन पिस्टल दोन मोटरसायकली नऊ जिवंत काडतूस असा एकूण एक लाख 35 हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल आरोपी आकाश उर्फ सोनू सावतकर व दुसरा आरोपी अवतारसिंग अमरसिंग खीच्ची वय 38 राहणार पाचोरी तालुका खकणार जिल्हा बऱ्हाणपूर मध्य प्रदेश यांच्या विरोधात शस्त्र अधिनियमाप्रमाणे कारवाई करण्यात आली असून आरोपी त्यांना न्यायालयात आज दिनांक 21 जून रोजी हजर केले असता त्यांना दिनांक 24 जून पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, उपविभागीय पोलिस अधिकारी अभिनव त्यागी यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सुनील अंबुलकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर भास्कर, पोलीस नाईक अनिल सुशिर, पोलीस नाईक उमेश शेगोकार, पोलीस नाईक शेख इरफान, पोलीस नाईक अतुल मोहाळे, पोलीस कॉन्स्टेबल मंगेश सोळंके, पोलीस कॉन्स्टेबल भारत बोंद्रे, पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय राऊत पोलीस कॉन्स्टेबल सचिन राजपूत, पोलीस कॉन्स्टेबल अमोल वनारे, पोलीस कॉन्स्टेबल डब्बे, पोलीस कॉन्स्टेबल योगेश माळी यांनी ही कारवाई यशस्वीरीत्या पूर्ण केली...

Previous Post Next Post