माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च 2022 अर्थात इयत्ता दहावी च्या वार्षिक परीक्षेचा निकाल नुकताच ऑनलाईन जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये स्थानिक केला आणि छोरीया सहकार विद्या मंदिर च्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून शाळेची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. सदर परीक्षेसाठी शाळेमधून एकूण 26 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यामध्ये कु. दिव्या नवलकिशोर टावरी हिला 95.40 टक्के, जय जीवनलाल राठी 94. 40% तर शुभम हिरासिंग जामरा यास 93 टक्के गुण प्राप्त झाले आहेत. हे विद्यार्थी शाळेमधून अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले असून एकूण विद्यार्थ्यांपैकी 24 विद्यार्थी प्राविण्य श्रेणी आणि दोन विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शाळेचे अध्यक्ष डॉ.किशोर केला, मुख्य संयोजिका डॉ.सौ स्वाती केला, शाळेचे प्राचार्य विनायक उमाळे सर,पर्यवेक्षिका सौ अर्चना कुलकर्णी मॅडम, वर्गशिक्षिका कु.मनीषा म्हसाळ, विषय शिक्षिका अरुणा व्यवहारे, जगदीश राऊत, राजेश आठवले यांचेसह सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले.
केला आणि छोरीया सहकार विद्या मंदिर जळगाव जामोद शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ...
जळगांव जा.प्रतिनिधी:-
