जवळपास चाळीस हजाराच्यावर लोकसंख्या असलेल्या हिवरखेड ग्रामपंचायतीचे रूपांतर "हिवरखेड नगरपंचायती "मध्ये व्हावे यासाठी गेल्या चाळीस वर्षांपासूनची सामूहिक लढ्याला अखेर यश आले असून शासनाकडून नगरपंचायतीची उद्घोषणा करण्यात आली आहे.हिवरखेड ही ग्रामपंचायत विदर्भातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असून नागरीक्षेत्र घोषित होण्यासाठीचे संपूर्ण निकष पूर्ण होत असल्यामुळे हिवरखेड ग्रामपंचायतिचे रूपांतर नगरपंचायत मध्ये व्हावे यासाठी 22 वर्षापूर्वी प्रथम महिला सरपंच इंदिरताई इंगळे यांच्यापासून सुरू झालेल्या या लढ्यात हिवरखेडातील अनेक सामाजिक संघटना, पक्ष, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार बांधव यांच्यासह समस्त हीवरखेडवासीयांचा संघर्ष सुरूच होता यामध्ये आमरण उपोषण, अन्नत्याग आंदोलन, निदर्शने, प्रदर्शने, मूक मोर्चा, आत्मदहन इशारा, इच्छामरण, मुंडन आंदोलन, बाजारपेठ बंद आंदोलन, रक्तदान तथा रक्तसकल्प अभियान अशी अनेक आंदोलने झाली. हिवरखेड नगरपंचायत व्हावी यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी तथा विद्यमान जिल्हाधिकारी निमा अरोरा मॅडम यांच्यासह संबंधित सर्व वरिष्ठ अधिकारी यांनी सुद्धा सकारात्मक पाऊले उचलली. पत्रकार संघाच्या विनंती वरून तत्कालीन राज्यमंत्री रामदास बोडखे यांच्यानंतर आमदार अमोल मिटकरी यांनी मंत्रालयात व विधानसभेत आपला आवाज बुलंद केला आमदार अमोल मिटकरी यांनी विधिमंडळात हीवरखेड नगरपंचायत होण्यांबाबत वारंवार तारांकित प्रश उपस्तीती करून सदर प्रश रेटून धरला. नुकतेच आदर्श पत्रकार संघ , अखिल भारतीय पत्रकार संघ व हिवरखेड वासीयांनी रक्तसकल्प अभियान केले त्यामध्ये अनेक नागरिकांनी रक्तदान करून आपल्या रक्ताने मा. मुख्यमंत्री, नगरविकास मंत्री व संबंधित मंत्री अधिकारी व आमदारांना पत्र लिहून नगरपंचायती साठीचे आपली महत्वाकांक्षा दाखवून दिली कदाचित ही बाबच गंभीर्याने घेऊन शासनाकडून तात्काळ पाऊले उचलल्या गेली व नगरपंचायतीच्या उद्घोषणा करण्यात आली असावी.शेवटी 22 वर्षांपासूनची हिवरखेड वासीयांच्या सामूहिक लढ्याला यश आले. हिवरखेडवासीयांनि शासनाचे आभार मानून ढोल ताशे वाजवून एकच जल्लोष केला असून तात्काळ हीवरखेड नगरपंचायत बाबत आवश्यक त्या तरतुदी कराव्यात अशी मागणी नागरिकांनि केली आहे
हिवरखेड वासीयांच्या 22 वर्षाच्या लढ्याला यश..शासनाकडून हिवरखेड नगरपंचायतीची उद्घोषणा..रक्तसंकल्प अभियान ठरले निर्णायक..!
प्रशांत भोपळे/हिवरखेड प्रतिनिधी...
