सातपुडा शिक्षण संस्था सलग्ननीत स्वा. वीर गणपतराव इंगळे उद्यानविद्या महाविद्यालयातील चतुर्थ वर्षाच्या कृषीदुतांकडून जळगांव जामोद तालुक्यातील बोरोळा व निंबोरा ग्रामपंचायत अंतर्गत बोराळा (खु.) आणि बोराळा (बु.) निंबोरा(खु.) या गावात पशु लसीकरण आयोजित केले. सरपंच सौ.सुरेखा ताई तिजारे (बोराळा खुर्द) आणि सरपंच सौ.जयश्री ताई बुरुकले (बोराळा बुद्रूक) यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. या शिबिरात घटसर्प, फऱ्या व इतर रोगांचे निदान करून लसी देण्यात आल्या. विविध आजारांवर उपाय सुचवण्यात आले. पावसाळ्यात जनावरांच्या विविध आजारांविषयाची माहिती पशु पालकांना देण्यात आली. या वेळी पशुवैद्यकीय दवाखान्यातील डॉ.गव्हांदे सर व त्यांचे सहकारी होते.तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये जाऊन शाळेच्या मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली योग दिवस साजरा केला या मध्ये शाळेचे मुख्याध्यापक श्री.इंगळे सर, कृषिदुत अनिकेत धनोकार आणि वैभव फुसे यांनी योग दिनाची माहिती सांगितली व त्याचे महत्व गावकऱ्यांना व विद्यार्थी मित्रांना समजावून सांगितले आणि विविध योगासन करून दाखविले तसेच त्याचे फायदे सांगितले या मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकांचा व इतर शिक्षकांचा सहभाग मिळाला.विद्यार्थांना कॉलेजचे प्राचार्य प्रा. योगेश गवई, उपप्राचार्य प्रा.सतीश एस धर्माळ, कार्यक्रम समन्वयक प्रा. पी.एस.वानखडे, विस्तार शिक्षण विषयतज्ञ जे.आर.साळी,विषयतज्ञ प्रा.महेश आखुड, आदी यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रम तसेच पशु लसीकरण कार्यक्रम आणि योग दिवस कार्यक्रम आयोजित करण्यात आले.यावेळी ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रमाची जबाबदारी कृषीदुतांनी पार पाडली. गट प्रमुख श्रेयश फुलारी,अनिकेत धनोकार व वैभव फुसे,प्रणव देशमुख,प्रज्वल लहाने,अंकुश लाकडे,निनाद कोंडे, विजयसिंह डाबेराव, ऋषिकेश आकोटकार, गौरव चौरीवाल,चेतन डिवरे, व्यंकटेशवर धनिरेड्डी या कृषीदुतांचा सहभाग आहे.
जळगाव जामोद येथे सातपुडा शिक्षण संस्थापशुरोग निदान व लसीकरण शिबिर संपन्न...
जळगांव जा.प्रतिनिधी:-
