वरणगावच्या शिवसैनिकांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे समानार्थ घोषणाबाजी... शिवसेना आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबत असल्याचा केला निर्धार....


 वरणगांव प्रतिनिधी/सुनील पाचपोळ..

वरणगाव येथील शिवसैनिकांनी आज गुरुवार रोजी सकाळी शिवसेना संपर्क कार्यालयामध्ये सर्व शिव सैनिक जमा होऊन पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेसोबत असल्याचा निर्धार यावेळी केला. तसेंच एकनाथ शिंदे यांच्यासह गुवाहाटीत गेलेले सर्व आमदार आणि एकनाथ शिंदे परत या अशी आर्त हाक देखील येथील शिवसैनिकांनी केली आहे.शिवसेना संपर्क कार्यालयात जिल्हा प्रमुख समाधान महाजन सर यांच्या आदेशाने वरणगाव शहरातील शिवसैनिक एकत्र येऊन हिंदुहृदयसम्राट सरसेनासपती बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जय भवानी जय शिवजी, उद्धव साहेब तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं, आवाज कुणाचा शिवसेनेचा विविध घोषणांनी पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्या. यावेळी परिसर शिवसेनेच्या घोषणांनी दणाणून गेला.यावेळी भुसाळ उपतालुकाप्रमुख  सुभाष चौधरी, वरणगाव शिवसेना शहरप्रमुख संतोष माळी, निलेश ठाकूर, उपशहर प्रमुख अशोक शर्मा, सुखदेव धनगर, राम शेटे, मुस्लिम समाजाचे सय्यद जाफर अली उर्फ हिप्पी शेठ, अल्पसंख्यांक जिल्हा संघटक सईद मुल्लाजी, तालुका संघटक मोहसीन खान, माजी उपशहर प्रमुख सुनील भोई, शिवा भाई  संजीव कोळी, ज्येष्ठ शिवसैनिक नितीन देशमुख, यशवंत बढे, उमाकांत झांबरे, सुरेश चौधरी, अतुल पाटील, राहुल वंजारी, माजी ग्रा. पं. सदस्य विलास वंजारी, सुनील देवघाटोळे, दीपक शेळके,  वैभव लोखंडे,  रोहित मुळे, किरण माळी यांच्यासह शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Previous Post Next Post