माजी डि एफ ओ शिवकुमार याच्या अर्जावरील सुनावणी केली तहकुब...


 राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी

धारणी तालुक्यातील हरीसाल वनपरिक्षेत्र अधिकारी दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणी मुख्य आरोपी गुगामल वनपरिक्षेत्रातिल असलेल्या डि एफ ओ विनोद शिवकुमार यांनी स्वतःच विरुद्ध खटला व एफ आय आर रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल केला असून न्यायालयाने सोमवारी सरकारच्या विनंती वरुन दोन आठवडे यांची सुनावणी तहकूब करण्यात आली आहे.शिवकुमार हा दिपाली चव्हाण सोबत सतत मानशिक व शारीरिक छळ करीत होता. त्यामुळे दिपाली चव्हाण यांनी २५ मार्च २०२१ रोजी सायंकाळच्या सुमारास आत्महत्या केली होती. धारणी पोलीस ठाणेला तक्रार दाखल आहे.त्यावरून धारणी पोलीसांनी २६ मार्च २०२१ रोजी उपवनसंरक्षक शिवकुमार विरुद्ध एफ आय आर करण्यात आले. तसेच चौकशी पुर्ण झाल्यावर सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.

Previous Post Next Post