जळगाव जामोद तालुक्यातील बहुचर्चित असलेली तालुक्यातील ८ गावांची सर्वात मोठ्या ग्रामसेवा सहकारी सोसायटी ची निवडणुक दिनांक २६ जून रोजी पार पडली. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे बाळुभाऊ डिवरे, देवीभाऊ पाटील यांच्या नेतृत्वात असलेल्या ग्रामविकास पॅनल ला एका हाती सत्ता (१३-०)मिळाली.तर काँग्रेस,शिवसेना,वंचीत बहुजन आघाडी प्रणित परिवर्तन पॅनल चा दारुण पराभव. यावेळी सर्व जेष्ठ मंडळींचं मार्गदर्शन...मोलाची साथ...पंचक्रोशीतील मतदारांचा आशिर्वाद व विश्वासामुळेच...टाकळी पारसकर ग्रामसेवा सहकारी सोसायटी च्या निवडणुकीमध्ये ग्रामविकास पॅनल चे १३ पैकी १३ उमेदवार प्रचंड बहुमताने विजयी झाल्याबद्दल सर्व मतदारांचे आभार सर्व विजयी उमेदवारांनी मानले.यावेळी हरिभाऊ पारसकर, बाळु भाऊ डिवरे, शालिग्राम रोठे, हरिदास बाठे,सदाशिव हूरसाळ, महादेव भालतडक, समाधान वाघमारे, भगवान पांडे,संपत इंगळे, वैभव जाणे, गोपाळ घुळे, सहकार जेष्ठ नेते मुरलीधर पांडे,राम पारसकर, विश्वनाथ जाणे, नाना बाठे, प्रकाश पारसकर,समाधान निलजे,चेतन रोठे, भास्कर बाठे, भैय्या रोठे, गणेश जाणे, गजानन भाळतडक, दत्ता डीवरे, , रामा रोठे, विशाल पारसकर,मोहन पारसकर, आकाश जाणे, निलेश हुरसल,गणा जाणे, सदाशिव जाणे, निलेश निलजे, पवन डीवरे, योगेश भलतडक, बहुसंख्येने पंचक्रोशीतील मतदार उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ची टाकळी पारसकर ग्रामसेवा सहकारी सोसायटी वर एक हाती सत्ता...
जळगांव जा.प्रतिनिधी:-
