महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या मार्च 2022 च्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत स्थानिक बापुमिया सिराजोद्दीन पटेल कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दरवर्षीप्रमाणे उज्वल निकालाची परंपरा कायम ठेवली असून कनिष्ठ महाविद्यालयाचा एकूण निकाल 98.20% एवढा लागला आहे. विज्ञान शाखेचा एकूण निकाल 99.22% एवढा लागला असून विज्ञान शाखेमध्ये 129 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते त्यापैकी 128 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत त्यापैकी 58 विद्यार्थी विशेष प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले असून 60 विद्यार्थी प्रथम श्रेणी उत्तीर्ण झाले आहेत विज्ञान शाखेतून व कनिष्ठ महाविद्यालयातून प्रथम क्रमांक कु. तनवी रामराव कडू या विद्यार्थिनीने मिळविला असून तिला 89.67% गुण मिळाले आहेत तर द्वितीय क्रमांक हर्षल सुनील व्यवहारे या विद्यार्थ्याने 88.83% गुण घेऊन पटकाविला आहे तसेच तृतीय क्रमांक कु. सोनल विजय भोपळे या विद्यार्थिनीचा असून तिला 87.33% गुण प्राप्त झाले आहेत.वाणिज्य शाखेचा एकूण निकाल 97.43% एवढा लागला असून वाणिज्य शाखेतून परीक्षेस एकूण 78 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 76 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. वाणिज्य शाखेतून विशेष प्राविण्य श्रेणी 19 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून प्रथम श्रेणीत 50 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. वाणिज्य शाखेतून 83.00% घेऊन कु. भारती विजय भोपळे या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक मिळविला आहे तर कु. श्रद्धा सुबोध चिंचोळकर व कु. दुर्गा दिलीप काकडे या विद्यार्थिनींनी 82.00% गुण घेऊन द्वितीय क्रमांक मिळविला आहे. तर 81.83% गुण घेऊन कु. अनिता बळीराम पिंजरकर हिने तृतीय क्रमांक पटकाविला आहे. विशेष म्हणजे वाणिज्य शाखेतून अकाउंट या विषयात 100 पैकी 98 गुण घेऊन कु. अनिता बळीराम पिंजरकर ,स्नेहा संजय वाघ, कु. दुर्गा दिलीप काकडे कु. अर्पिता रामराव बिचारे या विद्यार्थिनींनी महाविद्यालयाचा नावलौकिक वाढविला आहे.कला शाखेतून 127 विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यापैकी 124 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कला शाखेचा एकूण निकाल 97.63% एवढा लागला आहे. कला शाखेमधून कु. प्रांजली शत्रुघ्न कंकाळे या विद्यार्थिनीने 76.83% गुण घेऊन प्रथम क्रमांक मिळविला आहे तर द्वितीय क्रमांक कु. सलोनी अरुण खांदे व दिव्या समाधान जाधव यांनी 73.50% गुण घेऊन पटकाविला आहे. तर तृतीय क्रमांक कु. किरण संतोष वानखडे या विद्यार्थिनीचा असून तिला 72.67% गुण प्राप्त झाले आहे.वरील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे सातपुडा शिक्षण व ग्रामीण विकास संस्थेचे अध्यक्ष माननीय अँड. सलीमजी पटेल साहेब यांनी अभिनंदन केले असून सर्वांना उज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. तसेच संस्थेचे सहसचिव माननीय श्री रब्बानी देशमुख, संचालक प्राध्यापक कय्युम पटेल, प्राचार्य मुकुंद इंगळे यांनीसुद्धा उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले आहे.
बापूमिया सिराजोद्दीन पटेल कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाची उज्वल निकालाची परंपरा कायम...
पिंपळगाव काळे प्रतिनिधी:-
