आकोट शहर व तालुक्यातील सर्व श्रावण बाळ व संजय गांधी योजनेचा राहिलेला पगार तोरीत द्यावा लखन इंगळे यांचा इशारा...


 सय्यद शकिल/अकोट ता.प्रतिनिधी....

गोरगरीब लोकांच्या न्याय हक्कासाठी नेहमी सक्रिय असलेले लखन इंगळे उपाध्यक्ष भारीप बहुजन महासंघ आकोट शहर यांच्या नेतृत्वात  तहसीलदार साहेब आकोट यांना निवेदन देण्यात आले निवेदन असे होते कि सर्व संजय गांधी व श्रावण बाळ योजने चे लाभार्थी  यांचा गेल्या तीन ते चार महिन्या पासुन पगार /निधी मिळाला नसुन या योजनेचे सर्व लाभार्थी हे दिव्यांग, वयोवृद्ध, विधवा महिला याच निधीवर लाभार्थी कुटुंबाचा  उदरनिर्वाह चालतो आज तीन ते च्यार महिन्या पासुन मानधन पगार न मिळाल्यामुळे त्यांच्यावर उपसमारीची वेळ आली आहे तसेच गोरगरीब लाभार्थी यांच्या पासुन उत्त्पनाचे दाखले न घेता पटवारी दाखले घेण्यात यावे.कारण सर्व संजय गांधी व श्रावण  बाळ दिव्यांग, विधवा महिला योजनेचे लाभार्थी यांना उत्त्पनाचे दाखले सादर करण्यात लावले असुन या मुळे श्रावण बाळ योजनेचे म्हातारे लाभार्थी यांना फार त्रास होत कारण काही म्हातारे लाभार्थी यांना चालने मुशकील होत आहे संजय गांधी निराधार दिव्यांग, विधवा महिला योजनेच्या लाभार्थी यांना कोणाचा आधार नसल्याने यांना सुद्धा त्रास होत असुन करीता गरीब लाभार्थी यांचा सेतु मध्ये होणारा खर्च व त्रास कमी होण्यासाठी आपण पटवारी दाखले घेण्यात यावे व त्यांना तोरीत पगार त्यांच्या खाते मध्ये जमा करण्यात यावा करीता आपण योग्य निर्णय घेऊन आपण दिलेले उत्त्पनाचे दाखले सादर करायचे आदेश रद्द करण्यात यावे नाहीतर आम्ही लाभार्थी सह आंदोलन /मोर्चे आपल्या कार्यालय येथे काढू काही अनुचित प्रकार घडल्यास यास संबंधित अधिकारी जबाबदार राहतील याची नोंद घ्यावी असा इशारा लखन इंगळे उपाध्यक्ष भारीप बहुजन महासंघ आकोट यांनी  तहसीलदार साहेब आकोट यांना दिला सोबत नंदकिशोर गोरडे विलास तेलगोटे पंजाबराव पाचपाटील नितीन तेलगोटे सुगत लबळे नवनीत तेलगोटे  श्रीकृष्ण डेरे गजानन रेळे रामदास तेलगोटे सुगत तेलगोटे प्रतीक तेलगोटे राजु पोटे अंकुश चौधरी निलेश चपाई राजु भोंडे रामेश्वर दाभाडे विशाल पडघामोल असे लोकांच्या नावे व सह्या आहेत.

Previous Post Next Post