दिनांक 5 जून 2022 रोजी डॉ.सुचिता पाटेकर मॅडम शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक जिल्हा परिषद अकोला यांनी सहदेवराव भोपळे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय हिवरखेड येथे सुरू असलेल्या NMMS शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन शिबिराला भेट दिली.सदर शिबिर हे भोपळे विद्यालय व तेल्हारा तालुका विज्ञान मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 3 जून 2022 ते 7 जून 2022 पर्यंत आयोजित करण्यात आलेले आहे. सदर शिबिरामध्ये हिवरखेड परिसरातील सर्व शाळांच्या एकूण 148 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष महात्मा फुले शिक्षण संस्थेचे सहकार्यवाह श्यामशिल भोपळे व प्रमुख उपस्थिती डॉ. रवींद्र भास्कर अध्यक्ष जिल्हा विज्ञान मंडळ अकोला हे होते. आपल्या मार्गदर्शनपर भाषणा मध्ये डॉ. पाटेकर मॅडम यांनी विद्यार्थ्यांना जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास, सातत्यपूर्ण प्रयत्न या माध्यमातून जीवनाचे ध्येय साध्य करण्यासाठी कसे मार्गक्रमण करावे याबाबत मार्गदर्शन केले. पुस्तकी अभ्यासासोबतच परिसर अभ्यासातून विद्यार्थी हा उंचीचे शिखर गाठू शकतो तसेच व्यवसायिक शिक्षणातून स्वतःचे भविष्य घडवू शकतो असे प्रकर्षाने सांगितले. विशेष उपस्थिती डॉ. रवींद्र भास्कर यांनी शिष्यवृत्ती परीक्षा बाबत अमूल्य मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्यामशील भोपळे यांनी डॉ.पाटेकर मॅडम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा वारसा खऱ्या अर्थाने पुढे नेत असल्याबाबतचे गौरवउद्गार केले. तसेच 5 जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शालेय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. या शिबिरासाठी तालुका विज्ञान मंडळाचे अध्यक्ष विलास घुंगड सर ,सहदेवराव भोपळे विद्यालयाच्या प्राचार्या कु.वालोकार मॅडम यांच्या मार्गदर्शनात स्नेहल भोपळे सर, रणजित राठोड सर,प्रशांत भोपळे सर,सचिन दहि सर, सुनील वाकोडे सर,अमोल येऊल सर, श्रीकांत परनाटे सर, गिरी मॅडम, वडतकर मॅडम,सतीश सांगोळे सर,अभिजीत भोपळे सर, निलेश गीरे सर, संतोषकुमार राऊत सर अथक परिश्रम घेत आहेत. शिबिराच्या यशस्वितेसाठी प्राध्यापक गणेश भोपळे सर अंबादास चाफे,गजानन पवार, निलेश दांडगे, पूजाताई धूरदेव,अनंता भोपळे यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे संचालन प्रशांत भोपळे तर प्रास्ताविक कु वालोकर मॅडम व आभार प्रदर्शन स्नेहल भोपळे यांनी केले.
शिक्षणाधिकारी डॉ.सुचिता पाटेकर यांची भोपळे विद्यालयास भेट..
प्रशांत भोपळे/हिवरखेड प्रतिनिधी...
