भुलोरी गावात वाघाने केला दोन गुरांवर हल्ला...


 धारणी ता. प्रतींनिधी : सुंदर पोटेकर,

धारणी तालुक्यात दि. ०६/०६/२०२२ रोजी गावातील जनावरे चारण्यासाठी भुलोरी गावाचे शालिकराम धांडे जनावरे घेऊन चारण्यासाठी जंगलात गेला असता दुपारी १२ वाजताच्या सुमारे ‘सापना देव व जुनापाणी जवळ वाघाने दोन गुरांवर ताबडतोब हल्ला करून जागेवरच ठार केले. ही घटना ढाकना रेंज मध्ये घडली. हे दृश्य बघून गुरे चारणारा शालिकराम धांडे धावत गावात जाऊन भुलोरी येथील गावकर्यांडना सदर घटनेसंदर्भात माहिती दिली. गावकर्यांिनी लगेच घटनास्थळी धाव घेतली व त्यांनी वाघाने हल्ला करून ठार केलेल्या गुरांची पाहणी केली व तात्काळ ढाकना रेंजच्या अधिकार्यांलशी संपर्क केला. परंतु एकही जबाबदार अधिकारी घटनास्थळावर पोहोचले नाही त्यामुळे गावातील नागरिकांनी वनविभागाच्या अधिकार्याीवर नाराजी व्यक्त केली आहे व या अधिकार्याासंदर्भात नागरिकांच्या मनात आक्रोश आहे. जगन बाबू मावस्कर व संतोष शेलेकर या गरीब शेतकर्यांरची वाघाच्या हल्ल्यामध्ये ठार झालेली जनावरे आहेत. गावकर्यां ची व गुरे मालकांची स्पष्ट मागणी आहे की फॉरेस्ट विभागाकडून त्यांचे जे नुकसान झाले त्याची नुकसान भरपाई शासनाकडून देण्यात यावी. हातीदा येथील सरपंच गंगाबाई जावरकर यांनीसुद्धा नुकसान झालेल्या शेतकर्यांॉना त्वरित देण्यात यावी अशी मागणी केली आहे.

Previous Post Next Post