जीवन विकास संस्थेच्या वतीने जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा करण्यात आला...


 राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी...

जीवन विकास संस्थेच्या सबल प्रकल्पा अंतर्गत मेलघाट मधील चुनखडी, आवागड,बिबा,राहू , मलकापूर येथे पर्यावरण दिन साजरा  करण्यात आला . गेल्या पाच वर्षापासून जीवन विकास संस्थे मार्फत चिखलदरा तालुक्यातील 33 गावामध्ये कारितास इंडिया च्या विशेष सहाय्याने सबल प्रकल्प राबविल्या जात आहे. या मध्ये सेंद्रिय शेती ,पोषण आरोग्य सुरक्षा, उपजिविका,मृदा आणि जल संधारण  या वर कार्य केले जात आहे. 5 जून हा दिवस संपूर्ण जगात जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो व पर्यावरणाला वाचवण्या करिता प्रयत्न केल्या जाते. याचे औचित्य साधून सबल प्रकल्पा मधील  गावामध्ये वृक्षा रोपण करण्यात आले, वृक्ष व जल संवर्धन तसेच पर्यावरण वाचवण्यासाठी जनजागृती फेरी काढण्यात आली,तसेच जनावरांसाठी पाणी पिण्या करिता गावाजवळ व जंगलात  श्रमदानातून व्यवस्था करण्यात आली. या कार्यक्रमाकरिता एस.व्ही.भोंडे  (वनपाल), ए.जी.शिंदे  (वनरक्षक),छोटेलाल काले जामुनकर(पोलिस पाटील, प्रमिला सोनोने (अंगनवाडी सेविका), फुंदा बेठेकर ,(आशा सेविका )रूपेश इंगळे (प्रकल्प समन्वयक) ,मंगेश येवले,गणेश जामुनकर ह्या सर्वांची उपस्थिती होती. तसेच गावकऱ्यांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवला व कार्यक्रम यशस्वी करण्या करिता परिश्रम घेतले.

Previous Post Next Post