शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी भूमिपुत्रांनी घेतली तहसीलदार जळगांव जामोद यांची भेट...


 जळगांव जामोद प्रतिनिधी:-

जळगाव जामोद तालुक्यामध्ये जवळपास पेरणीपूर्व शेतीची मशागत झाले असून बळीराजा हा येत्या काही दिवसातच पेरणीला सुरुवात करणार आहे.पेरणी करता लागणारे बी-बियाणे, खते घेण्यासाठी शेतकऱ्याला पैशाची जुळवाजुळव करावी लागते. त्याकरता अनेक शेतकरी हे बँकांनी दिलेल्या पीक कर्जाच्या भरोशावर आपल्या शेतीची बी-बियाणे आणून पेरणी करतात. 

तरी खाली दिलेल्या मागण्या शेतकऱ्यांना कोणताही त्रास न देता प्रशासनाने शासनाने सहकार्य करून सोडवाव्यात.

१) बँकांनी शेतकऱ्यांना तात्काळ पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे.

२) नवीन पीककर्ज वाटप चालू करावे.

३) अनेक बँकांनी लावलेले शेतकऱ्यांच्या खात्याला होल्ड कमी करण्यात यावेत.

४) कृषी सेवा केंद्रा कडून शेतकऱ्यांना कोणती अट न घालतात सरळ सरळ जे बी-बियाणे,खते उपलब्ध आहेत ते उपलब्ध करून देण्यात यावे.

वरील सर्व मागण्या रास्त असून प्रशासनाने शेतकऱ्याला आधार देऊन सहकार्य करावे अन्यथा भूमिपुत्रांच्या वतीने आंदोलन करण्यात येईल.या मागसाठी आज दिनांक १३ जून ला जळगाव जामोद तालुक्यातील शेतकरी पुत्रांच्या वतीने तहसीलदार मॅडम यांना निवेदन देऊन त्यांच्याशी चर्चा केली. तसेच भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया कृषी या शाखेच्या बँक व्यवस्थापक यांच्याशी सुद्धा चर्चा केली.यावेळी अक्षयभाऊ पाटील, तुकाराम पाटील, वैभव जाणे, अजय गिरी, अश्पाक देशमुख, सदाशिव जाणे, प्रज्वल वानखडे, विष्णू गवळी, पुरुषोत्तम गायकी तसेच बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.

Previous Post Next Post