हिवरखेड आकोट मार्गावरील नवीन पुलावर विदूत तारा लोंबल्या..जड वाहनाना होतो तारांचा स्पर्श ,होऊ शकते मोठी जिवितहानि...


 प्रशांत भोपळे/हिवरखेड प्रतिनिधी...

हिवरखेड आकोट रोडवरील गाडगेबाबा स्मशान भूमी जवळ बांधलेल्या उंच पुलावर्ती विदूत तारा लोंबल्या असून येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशी वाहनांना ह्या तारापासून धोका निर्माण झाला आहे,तर या अगोदर केळीने भरलेला ट्रकला त्या लोंबल्या त्तरांनी स्पर्श केला, व विदूत करड निर्माण झाला,सुदैवाने जीवितहानी टळली ह्या तारा कधीही हवा पाण्याने तुटू शकतात व मोठी हानी होऊ शकते,याबत सामाजिक कार्यकर्ते मधुकर पोके यांनी या संबंधित बांधकाम विभाग,व महावितरण कंपनीला कळवीले परंतु अजूनपर्यंत याबबत कुठल्याच अधिकारी कर्मचाऱ्यांनि दखल घेतली नाही, त्यामुळे प्रवाशांना निराशा आयकाला मिळत असून मोठ्या संकटाचा सामाना करावा लागत आहे, व मोठी जीवितहानी झाली तर याला जबाबदार महावितरण राहणार की बांधकाम विभाग असा सवाल सुध्दा प्रवाशी बोलत आहेत, या गंभीर बाबीकडे तात्काळ लक्ष देऊन या संबंधित अधिकाऱ्यांनी  दखल घ्यावी अशी मागणी प्रवाशी करत आहेत,

Previous Post Next Post