ग्राम पंचायत पानखाल्या येथे कर्तुत्ववान ग्रामसेवकाची नियुक्ती *


 धारणी तालुका प्रतिनिधी : सुंदर पोटेकर,

बरेच दिवसापासून ग्राम पंचायत पानखाल्या येथील नागरिक ग्राम पंचायतच्या विकासासाथी चांगल्या कर्तुत्ववान ग्राम सेवकाची वाट आतुरतेने पाहत होते. अखेर ईश्वराच्या किंवा शासनाच्या कृपेने ग्राम पंचायत पानखाल्या कर्तुत्ववान ग्रामसेवकाची श्री. बागेवार साहेब यांची नियुक्ती करून ग्राम पंचायत पानखाल्या येथील नागरिकांना ग्रामाचे विकासासाठी ग्रामसेवक श्री. बागेवार साहेब यांनी आश्वासन दिले की, मी तुमच्या कामासाठी नेहमी तत्पर राहून गावाची समस्या सोडवणार. आज दि. 07/06/2022 त्यांनी आपला कामाचा पदभार स्विकारला. ग्राम सेवकांच्या वक्तवाचे सर्व नागरिकांनी स्वागत केले. अंबाडी गावाचे दबंग व नेहमी सामाजिक कामात सक्रीय राहणारे पो. पाटील श्री. चंद्रसेन नांदुरकरजी कामात सक्रीय राहणारे  यांनी ग्रा.पं. कार्यालय पानखाल्या येथे पुष्प गुच्छ देवुन स्वागत केले. सदर कार्यक्रमात सरपंच श्रीमती संगिताताई धुरवे, तथा मुकेश जावरकर उप-सरपंच मांगालालजी, अर्जुन मावस्कर, प्रवेशजी किशन जांबेकर, ग्राम पंचायत सदस्या सौ. मनिषाताई नांदुरकर, सरीताताई जावरकर व सर्व गावकरी नागरिक उपस्थित होते.

Previous Post Next Post