कॅन्सर मुक्त महाराष्ट्र व्हावा या उदांत हेतूने भारतीय जनता पार्टी व जैन प्रकोष्ठ महाराष्ट्र प्रदेश हे कॅन्सर मुक्त महाराष्ट्र अभियान राबवित असून या अभियानाला जळगाव जामोद येथे ही आयोजित करण्याचे ठरविले आहे.सदर मोफत कॅन्सर तपासणी शिबिराचे आयोजन स्वर्गवासी श्रीरामजी कुटे गुरुजी चँरीटेबल ट्रस्ट च्या वतीने भारतीय जनता पार्टी व जैन प्रकोष्ठ महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने जळगाव जामोद येथील सहकार विद्या मंदिर येथे दिनांक 11 जून रोजी मोफत कॅन्सर तपासणी शिबिर आयोजित केले आहे तसेच दिनांक 12 जून रविवार रोजी जामोद येथील शारदा ज्ञानपीठ येथे सुद्धा मोफत कॅन्सर तपासणी शिबिराचे आयोजन सकाळी दहा वाजता करण्यात आले आहे यासह मोफत कॅन्सर तपासणी शिबिर संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल येथील सहकार विद्या मंदिर येथे दिनांक 10 जून रोजी सकाळी दहा वाजता आयोजित केली असून दोन्ही तालुक्यातील रुग्णांनी या शिबीराचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा असे आवाहन भारतीय जनता पार्टी जळगाव जामोद तालुक्याच्या वतीने करण्यात आले आहे सदर मोफत तपासणी शिबिराचे आयोजन स्वर्गवासी श्रीरामजी कुटे गुरुजी चॅरिटेबल ट्रस्ट जळगाव जामोद च्या वतीने करण्यात आले असून गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा. असे आवाहन भारतीय जनता पार्टी च्या वतीने माजी मंत्री आमदार डॉक्टर संजय कुटे यांचे जनसंपर्क प्रमुख माजी नगरसेवक निलेश शर्मा यांनी केले आहे...
स्व. श्रीरामजी कुटे गुरुजी चँरीटेबल ट्रस्ट च्या वतीने मोफत कॅन्सर तपासणी शिबिराचे आयोजन...
प्रतिनिधी:-अनिल भगत...
