मंगल काकडे/जळगांव जामोद प्रतिनिधी...
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पिंपळगाव काळे येथे दिनांक 29 जुन रोजी विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम उत्साहित साजरा करण्यात आला सदर कार्यक्रमात पिंपळगाव काळे चे प्रथम नागरिक सरपंच प्रीतिताई तायडे,उपसरपंच भारती ताई बांगर व सर्व सदस्य उपस्थित होते.तसेच जि.प उर्दू उच्च प्राथमिक शाळा, पिंपळगाव काळेचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रफीक ड्रायव्हर, उपाध्यक्ष अनिस सर सर्व समितीचे सदस्य व शाळेचे मुख्याध्यापक सय्यद मोबिन सर व शिक्षक वृंद हजर होते.गावात मोठया उत्साहात प्रभात फेरी काढण्यात आली याठिकाणी मोठ्या संख्येने गावातील नागरिक उपस्थित होते
