अप्पर पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या पथकाची जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे येथे दिनांक 29 जुन रोजी महाराष्ट्रामध्ये प्रतिबंधित सुगंधित गुटखा पकडून केली सकाळी 7:50 वाजता धडक कारवाई. सविस्तर असे की दिनांक 29 जून रोजी गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार अप्पर पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या विशेष पथकाने पळशी फाटा आडोळ येथे सकाळी साडे सात वाजे दरम्यान नाकाबंदी करीत असताना एका संशयित मोटर सायकल ला थांबवून विचारणा केली असता मोटर सायकल स्वार उडवाउडवीची उत्तरे देत होता. पथकाने विचारणा केली असता व गाडीवरील पोत्यांची चेकिंग केली असता सदर पथकाला त्यामध्ये विविध कंपन्यांचा सुगंधित तंबाखू पान मसाला गुटखा मिळून आल्याने आरोपी ताब्यात घेतला असता त्याचे नाव सुदर्शन विनायक अवचार वय 39 वर्षे राहणार पिंपळगाव काळे असे समजले त्याच्या ताब्यातून सुगंधित पान मसाला, गुटखा, वेगवेगळ्या कंपनीचा तंबाखू किंमत एक लाख दहा हजार व एक मोबाईल आणि मोटारसायकल व नगद 3610 रुपये असा ऐकुण 1 लाख 73 हजार सहाशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल आरोपीच्या ताब्यातून जप्त करण्यात आला सदर आरोपी सुदर्शन विनायक अवचार याच्यावर कलम 328, 128,272, 273 भादवी अन्नसुरक्षा मानके कायदा 2006 कलम 26 (2)(1),26(2)(IV),27(3)(D)(2)59 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास जळगाव जामोद पोलीस स्टेशनची पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक घोडेस्वार करीत आहेत.
पिंपळगाव काळे जवळील आडोळ येथे खामगाव विशेष पथकाची कारवाई लोखोच्या गुटख्यासह आरोपीस केले जेरबंद...
जळगांव जा.प्रतिनिधी:-मंगल काकडे...
