प्रशांत भोपळे/हिवरखेड प्रतिनिधी....
हिवरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या दानापूर येथे खुलेआम सुरू असलेल्या वरली मटक्यावर हिवरखेड पोलिसांनी धाड टाकली असता पोलिसांना वरली मटक्याचे साहित्य मिळून आले ,एका ठिकाणी नगदी ५४० रुपये तर दुसऱ्या धाडीत १११० रुपये मिळून आले, आरोपी संदेश वानखडे, लखन सावळे, राहुल वाकोडे, तर फरार आरोपी शेख कलिम ,शेख इस्माइल यांच्या विरुद्ध कलम १०९,१२ अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला, पुढील तपास हिवरखेड ठाणेंदार विजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली pis दातीर, बालोद,गवळी,साबळे, करीत आहेत,
