चिखलदरा तालुक्यातील सोमवारखेडा ते गौलखेडा बाजार या दोन गावाच्या रस्त्यावर पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत रस्ताचे कामे होत आहे. या रस्त्यावर शासनाने चांगले कामे व्हावे म्हणून या रस्त्यावर १५३.३३ कोटी रुपये मंजूर केले असून गौलखेडा बाजार ते सोमवारखेडा प्रजिमा ४६ रस्त्यांची सुधारणा लांबी ३.९० किमी आहे. या रस्त्यावर एकून आठ पुल (रपटे) मंजूर असून त्या पुलांचे काम एकदम माती मिक्स रेतीने निकृष्ट दर्जाचे होत असुन येथील अधिकारी मात्र कमिशनमध्ये खुश असल्याचे चित्र दिसून येत आहे. या पुलांच्या बाधकामावर पाणीची कमतरतेमुळे येथिल बांधकामाला तडे पडत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
तसेच येथिल रस्ताच्या कामावर कंत्राटदाराची येणे जाणे नसुन कंत्राटदारांचा इंजिनिअर अधिकाऱ्यांच्या आशिर्वादाने आपली मनमानी करीत असल्याचे दिसून येत आहे.
निकृष्ट दर्जाचे काम होत असल्यामुळे येथील अधिकारी वानखडे यांना दुरध्वनी व्दारे संपर्क साधला असता संपर्क होवू शकला नाही.
----------------------------------------
सोमवारखेडा ते गौलखेडा बाजार या रस्ताच्या पुलाचे कामची मि पाहणी केली असता हे काम अधिकाऱ्याच्या आशिर्वादाने एकदम निकृष्ट दर्जाचे सुरु असुन याला सर्वस्वी जबाबदार येथिल कामावर असलेले अधिकारी आहे. तसेच झालेल्या बांधकामाची मटेरियल ची टेस्ट करण्यात यावी. तसेच सोमवारखेडा ते गौलखेडा बाजार हे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे या बांधकामची तक्रार व अधिकाऱ्याची तक्रार मि जिल्हा पातळीवर व मंत्री पर्यंत करणार असल्याचे सरपंच अल्केश महल्ले याचे म्हणने आहे.
अल्केश महल्ले
सरपंच गौलखेडा बाजार
----------------------------------------
