दि १९ जून रोजी म रा ग्रामीण पत्रकार संघा तर्फे हिवरखेड पत्रकार भवन मध्ये आढावा बैठक संपन्न झाली त्यामध्ये बाहेरगवाहून प्रमुख पाहुणे शैलेश अलोने शेख अहमद आसिफ अली आयाज अली ज्ञानेश्वर निखाडे नरेंद्र कोंडे यांची उपस्थिती होती आणि त्यानंतर पि एल शिरसाट यांच्या फोटोंचे पूजन करून वृक्षारोपण करण्यात आले म रा ग्रामीण पत्रकार संघ हिवरखेड चे शहराध्यक्ष गजानन भाऊ राठोड यांनी एक वर्ष तर अध्यक्ष पदाचा पदभार सांभाळला होता परंतु आज आढावा बैठकीमध्ये त्यांनी स्वतःहून वरिष्ठांना त्यांच्या संपलेल्या कालावधीचा राजीनामा दिला आणि त्यांनी हिवरखेड मध्ये चांगले काम करून एक टिम उभी केली आहे तसेच वरिष्ठांनी व हिवरखेड मधील सर्व पदाधिकारी यांनी गजानन भाऊ राठोड यांचे पुष्पहार देऊन मी केलेल्या कार्याचा निरोप देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला त्यामध्ये उपस्थित असलेले प्रदीप पाटील सागर सुरळकार अब्दुल साकिब मुदस्सीर खान पवन नेरकर राहुल इंगोले, दीपक इसोकार , हरिओम भगत ,लवकेश राठोड आदींची बहुसंख्येने उपस्थिती होती.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघ हिवरखेड ची आढावा बैठक संपन्न...
प्रशांत भोपळे/ हिवरखेड प्रतिनिधी..
