वंचित बहुजन आघाडी ची शहर आढावा बैठक संपन्न..


 जळगांव जामोद प्रतिनिधी:-

दि.१९ जुन २०२२ रोजी स्थानिक पक्ष कार्यालय जळगांव जामोद येथे प्रदेश कार्यकारिणी च्या आदेशानुसार वंचित बहुजन आघाडी चे जिल्हा अध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली या बैठकिच्या अध्यक्षस्थानी शहर अध्यक्ष विशाल तायडे हे होते.जिल्हा अध्यक्ष यांनी मार्गदर्शनात प्रामुख्याने जळगांव जामोद शहरात येणाऱ्या निवडणुकीत पक्ष पुर्ण ताकदीने उतरणार आहे आणि पुर्ण २१  उमेदवार उभे करून नगर परिषदेवर वंचित चार झेंडा फडकेल असे यावेळी भाषणात म्हणाले पुढे त्यांनी शहर अध्यक्ष विशाल तायडे व विशेष करुन निवडनुकिची जबाबदारी शंकरराव इंगळे जिल्हा उपाध्यक्ष यांच्यावर आणि सर्व पदाधिकारी यांनी उमेदवार यांची चाचपणी स्थानिक पातळीवर सर्वांना विश्वासात घेऊन करावे आणि वरिष्ठांकडे सर्व माहिती पाठवावी असे आव्हान यावेळी केले.या बैठकिला जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव इंगळे,अताउल्ला खान, रविन्द्र नाईक, जिल्हा उपाध्यक्षा पार्वताबाई इंगळे,मुजिब खान,स्वप्निल गवई, विशाल तायडे,विजय सोनोने,प्रा,विजय सातव सर, प्रा, श्रीकृष्ण गवई,आजमभाई कुरेशी,देवानंद दामोदर, सुनिताताई हेलोडे,सोनमताई वानखडे, सुनिल बोदडे, संजय बोदडे,अमोल तायडे,विजय तायडे, नंदकिशोर वानखडे,तुळशिराम वंडाळे, भास्कर भगत, मनोज अंदुरकर,या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा,सातवसर तर आभार प्रदर्शन प्रा.श्रीक्रुष्ण गवई यांनी केले यावेळी असंख्य महिला पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते

Previous Post Next Post