सहदेवराव भोपळे विद्यालयाचा उत्कृष्ट निकाल..


प्रशांत भोपळे/हिवरखेड प्रतिनिधी....

नुकत्याच जाहीर झालेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेच्या निकालात सहदेवराव भोपळे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी बाजी मारली असून दरवर्षीप्रमाणे उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे. या परीक्षेत एकूण १२७ विद्यार्थी प्रविष्ठ झालेले होते. या पैकी ५३ विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत तर ४३ विद्यार्थी प्रथम श्रेणीत येऊन १२४ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकालाची टक्केवारी ९७.६३ अशी आहे. या निकालात पहिल्या दहा क्रमांकामध्ये सेमी इंग्लिश मधील  कु.सलोनी दिपक भराटे-९५.४०,कु.भावना रवींद्र भारसाकळे-९३.२०, कु.आकांक्षा गजानन धरमकर-९२.८०,कु.श्रुती प्रशांत मोगरे-९१.८०,कु.तृप्ती चंद्रकांत सोनोने-९१.००,कु.दिपाली अशोक शेंडे-९०.८०,कु.पूनम भगवान चांदूरकर-९०.६०,कु.ईशा हरिदास बाभूळकर-९०.६०,कु.गुंजन विनोद रंदे-९०.२०,चि.हर्षदीप सोहनकुमार दामधर-९०.२०,कु.वैष्णवी संतोष उमाळे-८९.४०,कु.निधी वसंत बाजारे-८९.०० तसेच  मराठी माध्यमातील चि.अंश राजेश कट्यारमल-८७.६०,चि.जयेश प्रकाश धर्माळे-८६.२०,कु.श्रेया गंगाराम कवळकार-८५.८०,कु.प्राची संतोष गावंडे-७९.८०,कु.पायल अरुण तायडे-७८.६०, चि.सुबोध नितीन बावणे-७७.८०,कु.शुभांगी बाबुराव वाकोडे-७७.००,कु.शिवानी संजय खेडकर-७६.६०, कु.शिवानी उमेश वाकोडे-७४.८०,कु.श्रेया गोपाल बोबडे-७४.४० टक्के गुण मिळालेले आहेत. या यशाबद्दल महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिलकुमार भोपळे,सहकार्यवाह श्यामशील भोपळे, तथा संस्थेचे समस्त संचालक, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका रजनी वालोकार, शाळेचे सर्व शिक्षक- कर्मचारी यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले आहे.

Previous Post Next Post