प्रशांत भोपळे/हिवरखेड प्रतिनिधी...
हिवरखेड येथील जिल्हा परिषद महात्मा गांधी विद्यालय चा दहावीचा निकाल 94.33% लागला असून उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे.कु. खादिजा खानम इरफान खान हिने 91.40% गुण मिळउन विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला आहे. कु. नगमा खातून तफजुल खान हिने 88% गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला आहे तसेच कू. अनुष्का भगवान ताथोड हिने 86.60% गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला आहे. तसेच कु. साजिया खातुन शहादत खान हिने 85% गुण, मो.शोएब. मो.शफाकत.८१.८०%.गणेश अनंता जोध ह्याला 80% गुण व मयुरी सुभाष नराजे हिला 79.20% गुण प्राप्त केले आहेत. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक व शुभेच्छा चा वर्षाव पालकांसह सर्व स्तरातून होत आहे. शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या यशाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.
