हिवरखेड येथील सेंट पॉल ऍकॅडमी हिवरखेड या शाळेचा इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के लागला असून दीपिका प्रकाश प्रकाश दामधर या विद्यार्थिनीने 96% मिळून शाळेत प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.तर प्रगती प्रवीण कोरडे या विद्यार्थिनीने 95 टक्के गुण प्राप्त करत द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. वेदांती अरुण दामधर या विद्यार्थिनीने 94 टक्के गुण प्राप्त करत तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे तसेच दहावीच्या परीक्षेला एकूण 30 विद्यार्थी सहभागी झाले होते यातील पहिले दहा विद्यार्थी 90 % च्या वर असून 17 विद्यार्थी 75 टक्के याच्यावर आहेत. दीपिका प्रकाश दामधर विद्यार्थिनीने मराठी या विषयात 100 पैकी 99 गुण प्राप्त केले आहेत. विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय प्राध्यापक चंद्रकांत तिवारी सर यांच्या योग्य नियोजनाला व मार्गदर्शनाला दिलेले असून त्याचबरोबर शिक्षकांच्या कठोर मेहनतीला दिले आहे.
मिळवलेल्या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक नवनीत जी लखोटिया सर, सचिव प्रमोद जी चांडक सर, उपाध्यक्ष लूनकरंजी डागा सर यांनी मिळवलेल्या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केलेले आहे
