एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ. भाजपच्या वतीने जळगाव जामोदमध्ये फटाके फोडून जल्लोष...


 जळगांव जा.प्रतिनिधी:-

राज्यामध्ये सुरू असलेल्या सत्ता नाट्यावर अखेर दिनांक 30 जून रोजी पडदा पडला. राज्यामध्ये असलेले महाविकास आघाडीचे अल्पमतात आलेले सरकार मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याने कोसळले. राज्यामध्ये मध्यावधी निवडणुकींना सामोरे न जाता भाजपाने शिवसेनेच्या बंडखोर गटाला पाठिंबा देत मुख्यमंत्रीपदी शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांची वर्णी लावली. त्यामुळे दिनांक 30 जून रोजी संध्याकाळी साडेसात वाजे दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली त्याचाच जल्लोष जळगाव जामोद मध्ये भाजपच्या वतीने फटाके फोडून करण्यात आला. जळगाव जामोद शहरातील दुर्गा चौक येथे शपथविधी संपन्न होतात भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने एकमेकांना पेढे भरवत फटाके फोडून जल्लोष करण्यात आला. यावेळी भाजपाचे सचिन बापू देशमुख, तालुकाध्यक्ष प्रकाश वाघ, शहराध्यक्ष अभिमन्यू भगत, माजी नगराध्यक्षा सीमाताई ढोबे, माजी नगरसेवक निलेश शर्मा, कैलास डोबे, मांगीलाल भन्साली, रमेश कोथळकार, सखाराम ताडे, शाकीर खान, उमेश येऊल,मंगेश तेलंगडे,राजु हिस्सल, यांच्यासह बहुसंख्या कार्यकर्ते व पदाधिकारी यांची यावेळी उपस्थिती होती.

Previous Post Next Post