एक बहुआयामी व्यक्तिमत्व; संजय कुमार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष..


 तेल्हारा प्रतिनिधी/संघपाल गवारगुरु

१ जुलै...  केंद्रीय विद्यालय संघटन, दिल्ली या बहुप्रचलित केंद्र  सरकारचा जो विभाग शिक्षण खात्याच्या अधिपत्याखाली येतो त्या विभागामध्ये केंद्रीय विद्यालय नं.२, ए.एफ.एस. पुणे या ठिकाणी मुख्याध्यापक असलेले संजय कुमार पाटील सर यांचा आज वाढदिवस. या निमित्त  शिक्षक अमोल वऱ्हाडे यांनी त्यांच्या त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कला- क्रीडा या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा घेतलेला हा मागोवा.संजय कुमार पाटील सर हे गेल्या दोन दशकांपासून केंद्रीय विद्यालय संघटन मध्ये अविरत सेवा देत आहेत. नुसती सेवा नाही तर त्यासोबत समाजातील दुर्बल घटक शिक्षणाच्या प्रवाहात कसा सामावला जाईल यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात. महाराष्ट्रातील कोल्हापूर ही  त्यांची जन्मभूमी असल्याने शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा पुढे नेत शैक्षणिक व सामाजिक कार्य पार पाडतांना संजय कुमार पाटील सर हे नेहमीच अग्रणी असतात. पाटील सर हे विशेषतः नेहमीच शैक्षणिक कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहतात. त्यांना शिक्षणासाठी कुणीही सहकार्य मागायला गेले तर अगत्यपूर्वक सहकार्य करुन त्यांची समस्या दूर करण्यासाठी ते प्रयत्न करतात. मग ती विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची समस्या असो, एखाद्या पालकाची पाल्याविषयी समस्या असो, शिक्षकांची समस्या असो किंवा शासकीय पातळीवरील समस्या असो. यास्तव  पाटील सर हे सदैव आपले योगदान देत असतात. ते यासाठी कुठल्याही मान - सन्मानाची अपेक्षा करीत नाहीत. उलट या गोष्टीकडे आपले कर्तव्य आहे या दृष्टिकोनातूनच ते पाहत असतात. पाटील सर यांच्या शैक्षणिक योगदानामुळे २०१७ मध्ये आय.आय.एच.एम. पुणे यांनी 'आदर्श शिक्षक' हा मानाचा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केले आहे. पाटील सर हे नेहमीच एका गोष्टींला केंद्रबिंदू मानतात ते म्हणजे विद्यार्थी होय. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा हे शैक्षणिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ते शिक्षणामध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करतात. शिकविण्यासाठी नवीन संशोधनावर भर  देतात. इतर शिक्षकांनाही नवीन संशोधनासाठी दिशा देतात, प्रेरणा देतात, मार्गदर्शन करतात. त्यासाठी ते स्वतः वेगवेगळे अभ्यासक्रम शिकतात. म्हणूनच संपूर्ण केंद्रीय विद्यालय संघटन मध्ये त्यांची आज 'तरुण अष्टपैलू मुख्याध्यापक' अशी त्यांची ओळख निर्माण झाली आहे. पाटील सर यांचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ते कुठलीही गोष्ट करण्या अगोदर त्याचा परिपूर्ण अभ्यास केल्या नंतरच त्याचे सादरीकरण करतात. त्यांनी स्वतः खेळ, योगा,समुपदेशन, व्यवस्थापन यासारख्या अनेक कौशल्यांवर आधारित अभ्यासक्रम स्वतः पूर्ण केलेले आहेत. म्हणूनच अशा या अष्टपैलू तरुण मुख्याध्यापकाचे शाळा व्यवस्थापन हे अतिशय वाखाणण्या जोगे आहे. अध्ययन-अध्यापन प्रक्रियेतील सूक्ष्म बाबींसाठी पाटील सर हे सर्वांनाच वेळोवेळी मदत करीत असतात. फक्त नोकरी करून पगार घेणे एवढ्यावरच आपले जीवन संपत नाही. हे सतत त्यांच्या कार्यातून दिसून येते. शाळेचे मुख्याध्यापक असून प्रत्येकाच्या वैयक्तिक जीवनातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी सर कधी मित्र,कधी मोठा भाऊ तर कधी वरिष्ठ या भूमिका घेऊन ते नेहमीच आपले कर्तव्य बजावित असतात. याचा मला स्वतः व्यक्तिगत अनुभव आहे. चाळीशी पार केलेली ही व्यक्ती आजही पंचविशीत असणाऱ्या तरुणाला लाजवेल असा उत्साह! चेहर्‍यावर नेहमी हास्य ठेऊन ही व्यक्ती सकाळपासून रात्री पर्यंत काम करीत असते. याचे नेहमीच सर्वांना कुतूहल व कौतुक वाटते.विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणासोबतच सामाजिक दृष्टिकोन, वैज्ञानिक दृष्टिकोन, पर्यावरण संवर्धन यासारखी मूल्य रुजविण्याचे काम संजय पाटील सर सदैव करीत असतात. शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील कार्यासाठी संजय कुमार पाटील सर यांचा आज सर्वत्र नावलौकिक आहे. कोव्हीड - १९ च्या काळामध्ये काही विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी मोबाईल उपलब्ध नव्हते तर अशा विद्यार्थ्यांना मोबाईल उपलब्ध करुन त्यांचे थांबलेले शिक्षण पुढे चालू ठेवण्याचे काम पाटील सरांनी केले यावरून त्यांची सामाजिक बांधिलकी किती दांडगी आहे याचा प्रत्येय येतो.  अशा प्रकारे सातत्याने केंद्रीय विद्यालय संघटन या संस्थेच्या कार्यात स्वतःला झोकून देऊन काम करणारे, आम्हा तरुण पिढीला सतत मार्गदर्शन करणारे आमचे आधारवड संजय कुमार पाटील सर यांचा आज वाढदिवस या निमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा...

" श्री.संजय कुमार पाटील सर हे कर्तव्यनिष्ठ व नैतिक मूल्यांची जपणूक करणारे हाडामासाचे शिक्षक आहेत. शिक्षण क्षेत्रातील त्यांचे सूक्ष्म परीक्षण हा त्यांचा कौशल्यपूर्ण गुण विद्यार्थी विकासासाठी खूप महत्त्वाचा आहे.सतत शिकण्याची अभ्यासूवृत्ती तसेच मदत करण्याची वृत्ती हे त्यांच्या स्वभावाचे  वैशिष्ट्य आहे.वैयक्तिकरित्या कुठल्याही प्रसंगाला तोंड देण्यासाठी मला नेहमीच मित्र,प्रसंगी मोठा भाऊ म्हणून सरांनी वेळोवेळी मार्गदर्शन  केले आहे. सरांचे शैक्षणिक कार्य त्यांना व त्यांच्या शाळेला भेटल्यावरच कळते. एकदा त्यांना भेटलेली व्यक्ती त्यांचा स्वभाव पाहून नक्कीच त्यांच्या प्रेमात पडेल यात तिळमात्रही शंका नाही. सरांचे शैक्षणिक व सामाजिक कार्य उत्तरोत्तर आणखी फुलत राहो,त्यांचा मार्गदर्शनपर सहवास नेहमीच माझ्या सोबत राहो हीच इच्छा व्यक्त करतो व सरांना उत्तम आरोग्य,आनंदमय जीवन,यश व ज्ञानमय जीवन प्रवास मिळो हीच इच्छा व्यक्त करून सरांना वाढदिवसाच्या निमित्ताने मनःपूर्वक शुभेच्छा देतो."

                       

     शब्द रचना      - अमोल वऱ्हाडे

     शिक्षक - केंद्रीय विद्यालय

Previous Post Next Post