अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा नंदनवन पर्यटन स्थळ थंड हवेचे ठिकाण विदर्भात प्रसिद्ध आहे अशातच चिखलदरा या ठिकाणी निसर्ग रम्य दृश्य डोळ्यात साठवून ठेवण्या साठी व आनंद लुटण्यासाठी रिमझिम पावसात रविवारी शनिवारी या निमित्ताने चिखलदरा पर्यटन स्थळावर पर्यटक मेळघाट परिसरात येत असतात या पर्यटकांकरीता स्थानिक चिखलदरा येथील सुशिक्षित बेरोजगार तरुण आपल्या खाजगी वाहनाने पर्यटकांना हॉर्स डिपार्टमेंटच्या अटीचे नियमाचे पालन करून जंगल सफारी करून घेत असतात परंतु निसर्ग ऋतू पावसाळा सुरू होताच फॉरेस्ट विभागाकडून जिप्सी चालकांना वाहने बंद करावी.असे सुचित केल्यामुळे अनेक जिप्सी चालकांवर आता उपासमारीची वेळ येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.दरवर्षी जिप्सी चालक शासनाकडे जिप्सी चालविण्या साठी निवेदन विनंती फॉरेस्ट विभाग कडे करत असतात चिखलदरा येथे नव्याने रुजू झालेले कर्तव्यदक्ष अधिकारी श्रीमान सुमंत सोळंके यांनी वरिष्ठ अधिकाऱ्याच्या आदेशावरून जिप्सी वर बंदी आणल्याची समजते त्याच अनुषंगाने जिप्सी संघटनेचे अध्यक्ष इबु शहा व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मान्सून वेळी जंगल सफारी बंद करू नये.अशा पद्धतीचे निवेदन देऊन डी एफ ओ यांच्याशी भेट घेतल्याचे समजते जंगल सफारी जिप्सी बंद झाल्याने अनेक कुटुंबावर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता आहे भविष्यात या चालकांचा आक्रोश निर्माण होईल व मोठे जन आंदोलन करू असा इशारा देखील संघटने कडून देण्यात आला आहे जिप्सी चालकांसोबत जंगलाची माहिती देणारे गाईड व इतर सुशिक्षित बेरोजगारांचा समावेश होता 150 नागरिकांचे कुटुंब उपाशीपोटी राहू नये म्हणून जंगल सफारी जिप्सी गाईड यांना फॉरेस्ट विभागाने परवानगी द्यावी अशी मागणी या शिष्टमंडळाची आहे चिखलदरा मध्ये येणारे महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील पर्यटक यांना योग्य ती माहिती चिखलदरा परिसरात मिळावी निसर्ग रम्य ठिकाण भीमकुंड पंच बोल देवी देवी पॉईंट मोझरी पॉईंट गार्डन सेमाडोह कोलकास ठाकूर पॉईंट गाविलगड किल्ला असे असंख्य डोळ्याला भुरळ घालणारे धबधबे झाडं झुडपे नदी नाले शुद्ध हवामान पर्यटकांना नैसर्गिक वातावरण पाहण्याकरिता मुभा देण्यात यावी.अशी मागणी जिप्सी संचालक करीत आहे चिखलदरा परतवाडा धामणगाव मार्गे हा रस्ता मजबूत डांबरीकरण झाल्यामुळे पर्यटकांची गर्दी सुद्धा वाढलेली आहे जंगल सफारी मुळे पर्यटकांची निराशा होऊ नये याकडे सुद्धा शासनाने लक्ष द्यावे.नगरपरिषद चिखलदरा यांच्या वतीने सुद्धा पर्यटकांकरिता योग्य ती काळजी घेतल्या जात आहे.पर्यटकांच्या सुख सोयीसाठी सर्व हॉटेल्स लॉज सुसज्ज आहेत चिखलदरा मधील लहान लहान व्यवसायिक यांनी आपली दुकाने बोर आंबे मक्का कणस, जांभूळ,रानभाज्या अशा वेगवेगळ्या लहान व्यवसायिकांनी उदरनिर्वासाठी पर्यटकांसाठी उपलब्ध करून ठेवली असल्याचे दिसून आले चिखलदरा, येथे पर्यटकांपासून महाराष्ट्र शासनाला महसूल देखील चांगला मिळत असल्याने पावसाळ्यातच या ठिकाणी मोठी गर्दी असते त्यामुळे अशा व्यवसायिकांवर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून फॉरेस्ट विभागाने जिप्सी चालकांना जंगल सफारीची परवानगी देऊन चिखलदराची सौंदर्य वाढवावे अशी मागणी शिवसेना संपर्कप्रमुख राहुल वैद्य टिल्लू भाऊ तिवारी मेळघाट विधानसभा प्रमुखशिवसेना तालुका अध्यक्ष साधुराम पाटील इबु शहा मोहसिन शेख शेख साजिद, नरेश तायवाडे, अनिल तायडे श्री मुंडे शिवसेना नेते, शेख सादिल चेतन जवंजाळ कुमारी श्रुती वाघमारे इत्यादी कार्यकर्त्यांनी फॉरेस्ट विभागाकडे मागणी केली आहे
चिखलदरा पर्यटन स्थळ, जंगल सफारी जिप्सी बंद केल्याने जिप्सी चालक व शिवसेना डी एफ ओ सुमत साळुंके यांच्या दरबारात...
राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी...
